प्रतिनिधी- देवबाग- शशांक कुमठेकर
भारत देशाच्या पंचाहत्तरव्या अमृतमहोत्सवी वर्ष साजरा होत असताना देवबाग ग्रामपंचायतने १४ ऑगस्ट रोजी आयोजित केलेल्या विशेष कार्यक्रमात लहान मुलांसाठी वेशभूषा स्पर्धा व मोबाईलचे दुष्परिणाम ह्या विषयी घेतलेल्या कार्यक्रमात ग्रामस्थांचा उस्फुर्त सहभाग मिळाला.प्रथमत: आयोजित व्याख्यानमालेत मोबाईलचे दुष्परिणाम ह्याबद्दल श्री योगेश प्रभु (संगितकार) तसेच श्री गजानन मांजरेकर ( चित्रपट कामगार संघटना, सिंधुदुर्ग . सदस्य) श्री भानुदास येरागी(पोलीस पाटील, देवबाग-तारकर्ली) तसेच श्री देवानंद चिंदरकर(माजी पं.सभापती, मालवण ) ह्यानी फार मोलाचे मार्गदर्शन केले.
मोबाईलचा वापर योग्य प्रकारे न झाल्यास त्याचा आरोग्यावर, मानसिकतेवर व सामाजिक संस्कृती कसा परिणाम होतो ह्या विषयी पालकांच्या नजरेत काही गोष्टी आणुन दिल्या. तसेच लहान मुलांच्या वेशभूषा स्पर्धेत १२ वर्षापर्यंतच्या वयोगटातील मुलांचा सहभाग वाखाणण्याजोगा होता.वेशभूषा स्पर्धेवेळी श्री महादेव घाडके(प्राथमिक शिक्षक) व श्री रोशन बारदेशकर (प्राथमिक शिक्षक) यांनी मुलांसाठी विचारलेल्या प्रश्नमंजुषा, उत्साहपूर्ण वातावरणात दाद घेऊन गेल्या.ह्यावेळी मुलांच्या तीक्ष्ण बुद्धीची झलक ग्रामिणपातळीवर कशी असते ह्याचा प्रत्यय ह्या कार्यक्रमात दिसून आला.
या वेशभूषा स्पर्धेला परिक्षक म्हणून श्री जीजी चोडणेकर(जेष्ठ दशावतार कलाकार, झी गौरव पुरस्कार प्राप्त), श्री बाबा कांदळगावकर (जेष्ठ नाटककार) व श्री सहदेव साळगांवकर (तारकर्ली देवबाग पर्यटन विकास संस्था अध्यक्ष) यांचं उत्कृष्ट सहकार्य व मोलाचे मार्गदर्शन लाभले. वेशभूषा स्पर्धा विजेता मध्ये गट पहिला (अंगणवाडी) प्रथम क्रमांक मनस्वी हेमंत राऊळ(चर्च शाळा) द्वितीय क्रमांक नचिकेत सुनील राऊळ,(चर्च शाळा), तृतीय क्रमांक ध्रृव महेंद्र गोवेकर (चर्च शाळा). उत्तेजनार्थ मल्हार गणेश मोंडकर (चर्च शाळा)व रूपेश विलास मोंडकर (चर्च शाळा). गट दुसरा (१ली ते ४थी) प्रथम क्रमांक यशश्री महादेव मयेकर, (प्रा.शाळा.नं.२) द्वितीय क्रमांक परशूराम नारायण चिंदरकर (चर्च शाळा), तृतीय क्रमांक गंधार दत्तप्रसाद तेंडोलकर(प्रा.शाळा नं.२, उत्तेजनार्थ पारस नारायण मयेकर (प्रा.शाळा नं.२)व चैतन्य विजय साळगांवकर प्रा.शाळा नं.३). गट तिसरा (५वी ते ७वी ) प्रथम क्रमांक हितेश ज्ञानेश्वर तुळसकर (प्रा.शाळा नं.१), द्वितीय क्रमांक कु.प्रज्ञा लक्ष्मण कुल्ले(प्रा.शाळा नं.१). गट चौथा प्रथम क्रमांक कुमार दत्तप्रसाद तेंडोलकर (हायस्कूल, देवबाग) आदि सर्व विजेत्यांचे अभिनंदन करताना त्यांची बक्षिसे १७ ऑगस्टच्या अमृतमहोत्सवी कार्यक्रमात देवबाग ग्रामपंचायत येथे वितरित करण्यात येथिल व ज्या सर्व स्पर्धक मुलानी वेशभूषा स्पर्धेत सहभाग घेतला त्या सर्वांना सहभाग प्रशस्तीपत्र देण्यात येतील असे जाहीर करण्यात आले.
यावेळी व्यासपीठावर समारंभाचे अध्यक्षस्थानी असलेले श्री जीजी चोडणेकर यांनी , चांगले कृतीशील विचारच आपल्याला मोठे करतात ह्याची जाणीव आपल्या भाषणात करून दिली. व्यासपीठावर श्री मोरेश्वर धुरी(उपसरपंच), श्री बाबा कांदळगावकर, श्री सहदेव साळगांवकर, श्री भानुदास येरागी,सौ मनिषा गांवकर (ग्रा.सदस्य),सौ.रावले . श्री मेस्त्री व श्री ए.जे.जोशी(ग्रामसेवक, देवबाग) आदि मान्यवर उपस्थित होते. सुत्रसंचलनाची जबाबदारी श्री महादेव घोडके व श्री गोसावी (प्रा.शिक्षक) निभावून कार्यक्रमाची शोभा वाढविली.पुर्ण कार्यक्रमाचे शिस्तबद्ध नियोजन ग्रामसेवक श्री ए.जे.जोशी यांनी केली व त्यांना मोलाचे सहकार्य श्री दादा सातोस्कर, श्री जायबा राऊळ व लिपिक सौ.प्रियंका राऊळ यांनी केले. समारंभाच्या शेवटी सेंट पीटर चर्च च्या मुख्याध्यापिका सॅन्ड्रा लोबो व सौ अनिता मयेकर(अंगणवाडी सेविका)व शमिला लुद्रिक यांच्या सुमधुर आवाजाने गायिलेल्या वंदे मातरम् राष्ट्रगीताने सांगता करण्यात आली.


