कासार्डे:-प्रतिनिधी
देवगड तालुक्यातील वेळगीवेचा सुपुत्र व प्रसिद्ध फोटोग्राफर, कासार्डे ज्यु. कॉलजचा आर्ट्सचा माजीविद्यार्थी अमोल लाड यांना प्रतिष्ठेचा ‘अजंठा एलोरा इंटरनॅशनल आर्ट गॅलेरी औरंगाबादवतीने देण्यात येणारा ‘आशिया स्टार आयकॉन आर्ट आचिवर्स अवार्ड-2022 आणि भारतीय कलारत्न आर्ट एक्सलन्सी अवॉर्ड -2022 या पारितोषिकाने त्यांना गौरविण्यात आले आहे.
ऑनलाईन पद्धतीने ही इंटरनॅशनल फोटोग्राफी स्पर्धा घेण्यात आली होती. या फोटोग्राफि स्पर्धेमध्ये त्यांनी केलेल्या फोटोग्राफीला हा मानाचा अवार्ड मिळाला आहे.
सध्या मुंबई स्थित असलेले अमोल लाड गेली 18 वर्ष अथक मेहनतीने फोटोग्राफी विश्वात त्यांनी आपले एक वेगळे स्थान निर्माण केले आहे.
अमोल लाड यांनी आतापर्यंत फोटोग्राफीमधील अनेक राज्य , राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कारावर आपली मोहोर उमटवली आहे .
या यशाबद्दल त्यांना स्व.बाळासाहेब ठाकरे यांचे पर्सनल फोटोग्राफर अरुण शृंगारपुरे सौ.ललिता अरुण शृंगारपुरे तसेच देवगड तालुक्याचे फोटोग्राफर राजन नवाळे यांचे बहूमोल मार्गदर्शन लाभले.
प्रेसफोटोग्राफी आणि वाईल्ड लाईफ फोटोग्राफी करतानाच ते फिल्म इंडस्ट्रीतील स्टिल फोटोग्राफी ,माॅडेलिंग फोटोग्राफीसाठी नावारूपास आले.
या पुरस्कारांमध्ये गोल्ड मेडल ,सन्मानपत्र आणि सन्मानचिन्हाचा समावेश आहे.या ऑनलाईन इंटरनॅशल फोटोग्राफी स्पर्धेत एकूण 173 देशामधील 1,23418 फोटो ग्राफरने भाग घेतला होता. 444 फोटोमधून अमोल लाड यांच्या फोटोला उत्तम रेटिंग मिळाले आणि 100 बेस्ट फोटोग्राफर लिस्टमधील स्थानासह अंतिम फेरीत दाखल होऊन पुरस्कारावर आपली मोहर उमटवली.या यशाबद्दल त्यांचे वेळगिवे परिसरातून अभिनंदन होत आहे.
फोटो:-२१/८/२०२२
अमोल लाड पुरस्कारासह


