प्रतिनिधी- संजय भाईप (सावंतवाडी )
गोवा बनावटीच्या चोरट्या दारूची वहातुक होणार असल्याची पक्की खबर बांदा पोलीसाना मीळताच बांदा पोलीस निरीक्षक शामराव काळे, उपनिरीक्षक समीर भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली बांदा पोलीस चेनाक्यावर वहानानची कसुन तपासणी करण्यात येत होती.आज पहाटे गोवा येथुन नाशिक येथे जाणारा पाढंर्या रंगाचा एम.एच.39 ए.डी.1702 हा अशोक लेलण कंपनीचा टेपो आला असता टेंपोची झडती घेतली असता टेंपोच्या हौद्यामध्ये गोवाबनावटीच्या दारूचे 50 खोके सापडुन आले. सदरची कारवाई आज पहाटे 3:30 वाजण्याच्या सुमारास करण्यात आली.
या चोरट्या वहातुकीवर कारवाई करून चार लाख साठ हजार आठशे रुपयांची दारु व नवु लाख रूपयाच्या टेंपो सह संशयीत विशाल रघुनाथ तुपे रा.नाशिक याला ताब्यात घेण्यात आले.सदरची कारवाई निरीक्षक शामराव काळे,उपनिरीक्षक समीर भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली काॅस्टेबल प्रथमेश पोवार ,संजय हुंबे यांनी केली.


