संजय राऊतांचा जेलमध्ये मुक्काम कायम, 5 सप्टेंबरपर्यंत कोठडी वाढली

0
23
एक महिन्यानंतर संजय राऊत मैदानात; प्रकृतीत सुधारणा, काँग्रेस–भाजपवर टीकास्त्र
एक महिन्यानंतर संजय राऊत मैदानात; प्रकृतीत सुधारणा, काँग्रेस–भाजपवर टीकास्त्र

मुंबई- मुंबईच्या गोरेगावमधील पत्राचाळ प्रकरणी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना आज पुन्हा एकदा ईडीच्या विशेष PMLA कोर्टामध्ये हजर करण्यात आले. संजय राऊत यांना कोर्टाने झटका दिला असून 5 सप्टेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडीमध्ये वाढ केली आहे.
पत्राचाळ प्रकरणामध्ये संजय साऊत यांना ईडीने चार 31 ऑगस्ट रोजी अटक केली होती. त्यानंतर कोर्टात हजर केले असता 22 ऑगस्टपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली होती. आज कोठडी संपल्यामुळे पुन्हा एकदा संजय राऊत यांना विशेष इडी कोर्टात हजर केले. संजय राऊत हे हातात कागदपत्रे घेऊन आले होते.
त्यांचा आज पेहराव बदलेला होता. झब्बा घालून राऊत कोर्टात हजर झाले होते. त्यानंतर न्यायाधीशांनी सुनावणीस सुरुवात केली. त्यानंतर राऊत यांच्या न्यायालयीन कोठडीमध्ये 5 सप्टेंबरपर्यंत वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे राऊत यांचा जेलमध्ये मुक्काम आणखी वाढला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here