सिंधुदुर्गनगरी :प्रतिनिधी अभिमन्यू वेंगुर्लेकर
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील महाविद्यालयांच्या व अभ्यास केंद्राच्या उद्घाटनासाठी महाराष्ट्राचे मा.राज्यपाल श्री. भगतसिंग कोश्यारी यांचे आगमन झाले. यावेळी माझ्यासोबत जिल्हाधिकारी मंजुलक्ष्मी तसेच इतर मान्यवर उपस्थित होते. यावेळी सिंधुदुर्गाच्या विकासाबद्दल श्री. कोश्यारी यांच्या बरोबर चर्चा झाली.राज्यपालांना ही निसर्ग सौंदर्याने नटलेल्या सिंधुदुर्गची भुरळ……!
राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोशारी आज प्रथमच सिंधुदुर्ग दौऱ्यावर आले होते.तळेरे येथे एका महाविद्यालयाच्या इमारतीच्या उदघाटन कार्यक्रमाला महामहिम आले होते.यावेळी त्यांनी आवर्जून सिंधुदुर्गच्या सौंदर्याची तारीफ करत ‘येवा कोकण आपलाच आसा’ म्हणणाऱ्या इथल्या कोकणी माणसांच्या स्वभावाची ही तारीफ केली.अशा निसर्गसौंदर्य सिंधुदुर्गात आपलं ही एक घर असावं अस वाटत असल्याचे ही ते म्हणाले.आम्ही उगाच नाय गर्वाने म्हणत….स्वर्गाहून ही सुंदर आमचा सिंधुदुर्ग!येवा कोकण आपलाच आसा!!
सागरी अभ्यास प्रकर्ष केंद्राचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या हस्ते भूमीपूजन
सिंधुदुर्गनगरी : वेंगुर्ला शहरातील नाटककार मधुसूदन कालेलकर बहुउद्देशीय सभागृहासमोर (कॅम्प परिसर) मुंबई विद्यापीठांतर्गंत उभारण्यात येणाऱ्या सागरी अभ्यास प्रकर्ष केंद्राचे भूमिपूजन राज्यपाल तथा कुलपती भगत सिंह कोश्यारी यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी नगर परिषदेचे मुख्याधिकारी डॉ . अमितकुमार सोंडगे यांच्या हस्ते राज्यपालांचा पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी शालेय शिक्षण आणि मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर, जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी, पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे, मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. सुहास पेडणेकर, प्र. कुलगुरू प्रा. रविंद्र कुलकर्णी, प्र. कुलसचिव डॉ. विनोद पाटील, वेंगुर्ला नगर परिषद प्रशासक प्रशांत पानवेकर आदी उपस्थित होते.
याप्रसंगी बाळासाहेब सावंत कोकण कृषी महाविद्यालयाचे प्राध्यापक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते .


