कोकण :एसटी डेपोला बाप्पा पावला, बाप्पाच्या स्वागतासाठी दीड लाख चाकरमानी कोकणकडे होणार रवाना

0
21
दैनिक सिंधुदुर्ग समाचार

प्रतिनिधी अभिमन्यू वेंगुर्लेकर

मुंबई- महाराष्ट्राच्या लालपरीचे विघ्न दूर करण्यासाठी अखेर विघ्नहर्ता धावून आल्याचे दिसत आहे. गणेशोत्सवानिमित्त कोकणात जाण्यासाठी यंदा दीड लाखांहून अधिक चाकरमानी कोकणात रवाना होणार आहेत.
गणेशोत्सवासाठी एसटी महामंडळाने सोडलेल्या गणपती स्पेशल जादा गाड्यांना चाकरमान्यांनी दिलेल्या प्रतिसादामुळे 31 ऑगस्ट 2022 पर्यंत सुमारे 3414 गाड्या फुल झाल्या आहेत. यापैकी 1951 गाड्यांना ग्रुप बुकिेंगचे प्राधान्य मिळाले आहे, अशी माहिती दएसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांनी दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here