जिल्ह्यात गणेशोत्सवाच्या अनुषंगाने जिल्ह्यात कायदा सुव्यवस्था व शांतता राखण्याच्या दृष्टीकोनातून पोलीस अधीक्षक राजेद्र दाभाडे यांच्या मार्गदर्शनाखाली दि 24 ऑगस्ट ते दि.25 ऑगस्ट 2022 रोजी पोलीस परेड ग्राऊंड सिंधुदुर्गनगरी येथे आवश्यक त्या नियमांचे पालन करुन अपर पोलीस अधीक्षक नितिन बगाटे यांच्या उपस्थितीत पोलीस मुख्यालयातील राखीव पोलीस निरीक्षक पालशेतकर, राखीव पोलीस उपपरीक्षक तोमर व स्टाफ, जलद प्रतिसाद पथक, दंगल नियंत्रण पथक तसेच पोलीस उप अधीक्षक (गृह), उपविभागीय पोलीस अधिकारी कणकवली विभाग,उपविभागीय पोलीस अधिकारी सावंतवाडी विभाग व स्टाफ यांचा ‘दंगा काबू योजना’ प्रात्यक्षिक सराव तसेच गोळीबार सराव, त्याचप्रमाणे अश्रुधूराचा वापर करण्याचा सराव घेण्यात आला.
गणेशोत्सव सण उत्साहात व आनंदात पार पाडण्यसाठी तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवणे कामी सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस यंत्रणा अद्यावत साधन सामग्रीसह सुसज्ज आहे. अशी माहिती पोलीस उपअधीक्षक (गृह) पोलीस अधीक्षक के.एन. गायकवाड यांनी दिली आहे.


