रत्नागिरी: तरुणाची ऑनलाईन फसवणूक महिलेविरोधात गुन्हा दाखल

0
24
ऑनलाइन गंडा,cyber crime,
नोकरीचे प्रलोभन दाखवून तरुणाला घातला ४ लाखांचा ऑनलाईन गंडा

रत्नागिरी- क्रेडिट कार्डचा फाईन रिफंड होणार असल्याची बतावणी करत तरुणाची सुमारे ४१ हजार रुपयांची ऑनलाईन फसवणूक केली . याप्रकरणी महिलेविरोधात ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे .
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार , असून ही घटना १७ ऑगस्ट रोजी सायंकाळी ५ वाजता कारवांचीवाडी येथे घडली . प्रियांका शर्मा असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयित महिलेचे नाव आहे . तिच्याविरोधात राजू सुभाष पवार ( ४२ , रा . आदर्श वसाहत कारवांचीवाडी , रत्नागिरी ) यांनी पोलिसांकडे तक्रार दिली आहे . त्यानुसार , १७ ऑगस्ट रोजी सायंकाळी राजू पवार यांच्या मोबाईलवर फोन करणाऱ्या महिलेने मी पूणे येथील ॲक्सिस बँकेतून बोलत असल्याचे सांगितले.त्यानंतर तुमचे क्रेडिट कार्ड उशिराने ॲक्टिव्ह केल्याने ५९० रुपयांचा लागलेला फाईन तुम्हाला रिफंड होणार असल्याचे सांगून मोबाईलवर आलेल्या मेसेजमधील कोड विचारुन घेतला . तिच्या बोलण्यावर विश्वास ठेवत पवार यांनी तो कोड सांगितल्यावर त्यांच्या बँक खात्यातून ४० हजार ९४० रुपये काढण्यात आल्याचा त्यांना मेसेज आला . आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर पवार यांनी सोमवार २९ ऑगस्ट रोजी ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दिली . याप्रकरणी अधिक तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक सुर्य करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here