सिंधुदुर्ग : खेलरत्न पुरस्कारासाठी पात्र खेळाडूंनी अर्ज करण्याचे आवाहन – जिल्हा क्रीडा अधिकारी विद्या शिरस

0
18
दैनिक सिंधुदुर्ग समाचार

भारत सरकार, युवा कार्यक्रम एवं खेल मंत्रालय, नवी दिल्ली यांनी मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार, खेळामध्ये यश संपादन केल्याबद्दल ध्यानचंद जीवनगौरव पुरस्कार, मौलाना अबुल कलाम आझाद ट्रॉफी (विद्यापीठांकरीता), द्रोणाचार्य पुरस्कार, राष्ट्रीय खेल प्रोत्साहन पुरस्कार, अर्जुन ॲवार्ड 2022 करीता पुरस्कारासाठी नामनिदेशनाचा प्रस्ताव दिनांक 20 सप्टेंबर 2022 रोजी रात्री 11.59 पर्यंत केंद्र शासनास सादर करावा. असे आवाहन सिंधुदुर्ग जिल्हा क्रीडा अधिकारी विद्या शिरस यांनी केले आहे.

या निर्देशित केलेल्या कालावधीनंतर प्राप्त होणारे अर्ज अथवा अपूर्ण अर्जांचा विचार केला जाणार नाही असे जाहीर करण्यात आले आहे. तसेच या वर्षीपासून पात्र खेळाडूंनी पुरस्काराकरिता च्या मार्गदर्शक तत्वानुसार (Award Guidelines) अर्जदारांनी स्वत: फक्त ऑनलाईन पोर्टलव्दारे आपले विहीत नमुन्यातील अर्ज कोणत्याही विभागाची / अथवा व्यक्तींची शिफारस न घेता थेट केंद्र शासनास dbtyas.sports.gov.in या पोर्टलवर/ वेबसाईटवर सादर करावे, असेही सूचित केले आहे.

ऑनलाईन अर्जाबाबत काही अडचण आल्यास Department of Sports At [email protected] किंवा 011-23387432 या संपर्क क्रमांकावर कार्यालयीन दिवशी कार्यालयीन वेळेत सकाळी 9.00 ते सायं. 5.30 पर्यंत संपर्क करता येईल.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here