सावंतवाडी
शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर यांनी आज सावंतवाडी येथील जनरल जगन्नाथ भोसले उद्यानाला भेट दिली. उद्यानाची पाहणी करत असताना उद्यानातील बंद खेळणी निदर्शनास आली. मोनोरेलचे काम लवकरात लवकर सुरु करून मुलांसाठी खेळणी ट्रेन सुरु करावी. जर ही ट्रेन सुरु न झाल्यास बदलून घ्यावी. सुरुवातीला सहा महिने हे उद्यान एमटीडीसीने चालवावे. त्यानंतर प्रशिक्षण देवून ते नगरपालिकेकडे वर्ग करावेत. मुलांच्या सुरक्षितेला प्राधान्य देत ही खेळणी सुरु करावीत.अशी सूचना केसरकर यांनी केली आहे.
यावेळी जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी, पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संजय कापडणीस, एमटीडीसीचे कार्यकारी अभियंता विनय वावधने, प्रांताधिकारी प्रशांत पानवेकर, सहायक वनसंरक्षक वर्षा खरमाटे, क्षेत्रिय वन अधिकारी विद्या घोडके, तहसिलदार श्रीधर पाटील, माजी नगरसेवक सुरेंद्र बांदेकर, शुभांगी सुके, खेमराज उर्फ बाबू कुडतरकर उपस्थित होते.


