टाटा समूहाचे माजी अध्यक्ष सायरस मिस्त्री हे मर्सिडीज कारमधून अहमदाबादहून मुंबईला जात असताना दुपारी 3.35 च्या सुमारास हा अपघात झाला. सूर्या नदीवरील पुलावर हा अपघात झाल्याची माहिती आहे.पालघर जिल्हा अधीक्षकांनी ही माहिती दिली आहे. अपघातात मिस्त्री यांचा जागीच मृत्यू झाला आहे. सायरस मिस्त्री हे 54 वर्षांचे होते.2016 साली टाटा उद्योग समूहाच्या अध्यक्षपदी होते.
सूर्या नदीवरील पुलावर त्यांची गाडी डिव्हायडला धडकल्यामुळे हा अपघात झाल्याची माहिती पालघर पोलीस अधिक्षकांनी दिली आहे. अपघातावेळी सायरस मिस्त्री हे मर्सिडिस गाडीतून प्रवास करत होते या अपघातावेळी गाडीत चार जण होते, यातील दोघांचा जागीच मृत्यू झाला तर इतर दोघांना जखणी अवस्थेत उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.


