सिंधुदुर्ग : शहरात पाच ठिकाणी निर्माल्य संकलन

0
35

वेंगुर्ला प्रतिनिधी- वेंगुर्ला नगरपरिषदेने शहरातील पाच महत्त्वाच्या गणेश विसर्जनस्थळी निर्माल्य कुंड्या ठेऊन निर्माल्य संकलनाचा उपक्रम राबविला.

शहरातील मांडवी, घाडीवाडा-पत्र्याचे पूल, खांबड भटवाडी, साकवपूल, परबवाडा सातेरी मंदिर अशा महत्त्वाच्या पाच गणेश विसर्जनस्थळी निर्माल्य कुंड्या ठेवल्या असून नगरपरिषदेचे कर्मचारी तेथील निर्माल्य संकलित करीत आहेत. दीड दिवस, पाच दिवस, सात दिवस, नऊ दिवस ते गणेश विसर्जनाच्या प्रत्येक दिवशी या पाच गणेश विसर्जनस्थळी पालिकेने सायंकाळी ५ ते रात्रौ गणेश विसर्जन होईपर्यंत कर्मचारी तैनात ठेवले आहेत. या कर्मचा-यांनी विसर्जन स्थळावरील निर्माल्य गोळा केले आहे. हे निर्माल्य पालिकेच्या कंपोस्ट डेपोमध्ये एकत्रित करुन त्यापासून गांडुळ खत तयार करण्यात येणार असल्याचे मुख्याधिकारी डॉ.अमितकुमार सोंडगे यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here