संजय भाईप (सावंतवाडी)
गेला महीनाभर दडीमारलेल्या पावसाने काल दुपारपासून मुसळधार पडण्यास सुरुवात केली. हवामान विभागाने कोकण आणि प.महाराष्ट्राला यल्लो अलर्ट दिला होता.मुसळधार पावसाने आज सकाळी तेरेखोल खाडी पात्राला पूर आला. पूराचे पाणी बांदा, शेर्ले, ईन्सुली भागात घुसले. बांदा बाजारपेठेत पुराचे पाणी पुन्हा घुसल्याने व्यापारीवर्ग चिंतेत पडला आहे.
गेली दोन वर्षे पुराचे पाणी बाजारपेठेतील दुकानांमध्ये घुसत असल्याने व्यापारी वर्गाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. पुराचे पाणी बांदा बाजारात घुसत असल्याने व्यापारी वर्गाचे मोठे नुकसान होत आहे.तसेच काही नुकसानग्रस्त व्यापाऱ्यांना अद्याप नुकसानभरपाई मिळाली नसल्याने नुकसानग्रस्तामधुन नाराजीचा स्वर उमटत आहे.त्यातच यावर्षीही तेरेखोल खाडीपात्राला पूर आल्याने व्यापारी वर्गाची चिंता वाढली आहे.

