रत्नागिरी: महावितरणच्या रत्नागिरी परिमंडळात आरोग्य तपासणी शिबीर संपन्न

0
71
आरवली वैद्यकीय व संशोधन केंद्राचा रौप्य महोत्सव
ओटवणेत आरोग्य तपासणी शिबीराला उस्फूर्त प्रतिसाद... २७५ जणांची तपासणी; मोफत औषधाचे वाटप

कोकण परिमंडळ : महावितरणच्या रत्नागिरी परिमंडळ कार्यालयात ॲस्टर आधार हॉस्पिटल, कोल्हापूरच्या वतीने अधिकारी-कर्मचाऱ्यांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबीर (दि. 13 रोजी) संपन्न झाले. या शिबीराचा रत्नागिरी शहरातील परिमंडळ, मंडळ, विभाग व सर्व उपविभाग, शाखा कार्यालयाच्या 225 जणांनी लाभ घेतला. शिबिरात रक्तदाब, मधुमेह, ऱ्हदयरोग, नेत्र, सांधेदुखी इ. तपासणी करण्यात आली. कर्मचाऱ्यांना टीटी इंजेक्शन देण्यात आले.

मुख्य अभियंता विजय भटकर यांच्या मार्गदर्शनाखाली परिमंडळात आरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी अधिक्षक अभियंता नितीन पळसुलेदेसाई, अधिक्षक अभियंता (पायाभूत आराखडा) कल्पना पाटील, सहा. महाव्यवस्थापक (मानव संसाधन)  वैभव थोरात, कार्यकारी अभियंता रामलिंग बेले, कार्यकारी अभियंता (स्थापत्य) ऋषिकेश लोखंडे, व्यवस्थापक (मानव संसाधन) तेजस पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. या शिबीराच्या संयोजनासाठी उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी अप्पासाहेब पाटील यांनी परिश्रम घेतले. कोल्हापूरस्थित ॲस्टर आधार हॉस्पिटलचे डॉ. तेहसीन साहिल हामदारे यांच्यासह सहकाऱ्यांनी सेवा बजावली. बुधवारी (दि. 14) चिपळूण व गुरुवारी (दि.15) खेड विभाग कार्यालयात सकाळी 10.00 ते 5.00 या वेळेत मोफत आरोग्य तपासणी शिबीर आयोजित केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here