वेंगुर्ला – मठ-कणकेवाडी येथील सायली गावडे हिच्या खूनप्रकरणी संशयित आरोपी गोविद उर्फ वैभव दाजी माधव याची न्यायालयीन कोठडी सोमवारी संपत असल्याने पोलिसांनी त्याला वेंगुर्ला प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयात हजर केले. त्याला शुक्रवार २३ सप्टेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले. त्यानुसार आरोपीची रवानगी सावंतवाडी कारागृहात करण्यात आली.


