सिंधुदुर्ग – प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना अंतर्गत अपघाती निधनानंतर २ लाख रुपये जमा

0
37

वेंगुर्ला प्रतिनिधी – प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना अंतर्गत सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या होडावडा शाखेत तुळस येथील ममता महेश साटम यांच्या खात्यात २ लाख रुपये जमा केले. याबाबतचे पत्र जिल्हा बँक अध्यक्ष मनिष दळवी यांच्या हस्ते श्रीमती साटम यांना सुपूर्द करण्यात आले.

तुळस-पांडेपरबवाडी येथील महेश वसंत साटम यांचे ९ जून २०२१ रोजी अपघाती निधन झाले होते. कै.साटम यांनी सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या होडावडा शाखेत प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना अंतर्गत विमा उतरवला होता. यांच्या मृत्यूनंतर त्यांचा वारस म्हणून त्यांची पत्नी ममता साटम यांना विम्याची २ लाख रुपये रक्कम यांच्या खात्यात जमा करण्यात आली आणि  याबाबतचे पत्र जिल्हा बँक अध्यक्ष मनिष दळवी यांच्या हस्ते तिला सुपूर्द करण्यात आले. यावेळी होडावडा शाखा व्यवस्थापक सुनील जाधव व बँक कर्मचारी आर्ची कांबळी, राघवी डिचोलकर, प्रितम ठाकूर आदी उपस्थित होते.

फोटोओळी – प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना अंतर्गत ममता महेश साटम यांच्या खात्यात २ लाख रुपये जमा झाल्याचे पत्र जिल्हा बँक अध्यक्ष मनिष दळवी यांनी दिले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here