रत्नागिरी- महसूल व वन विभाग, शासन निर्णय क्रमांक गौखनि/10/1021/प्र.क्र.82/ख-1, दिनांक 28 जानेवारी 2022 अन्वये वाळू/रेती निर्गती धोरणानुसार रत्नागिरी जिल्ह्यातील सन 2022-2023 (दिनांक 09/06/2023) या कालावधीचे महाराष्ट्र मेरीटाईम बोर्ड मुंबई यांच्या जलसर्व्हेक्षण अहवालानुसार जोग नदी /आंजर्ला खाड़ी, वाशिष्टी नदी/ दाभोळ खाडी, शास्त्री नदी/जयगड खाडी व काळबादेवी खाडीपात्रातील हातपाटी व डुबीद्वारे पारंपारिक पध्दतीने वाळू/रेती उत्खननासाठी चिन्हांकित केलेल्या विना लिलाव परवान्यासाठी राखीव असलेल्या रेती गटातील रेती उत्खननासाठी पारंपारिक पध्दतीने डुबी / हातपाटीद्वारे वाळू/रेती उत्खननाचा व्यवसाय करणा-या स्थानिक व्यक्ती/संस्थाकडून याद्वारे अर्ज मागविण्यात येत आहेत.
जिल्हयातील खाडीपात्रातील रेतीगटांचा सविस्तर तपशिल, विहित नमुन्यातील अर्ज व आवश्यक त्या कागदपत्रांची यादी जिल्हाधिकारी कार्यालय, (खनिकर्म शाखा) रत्नागिरी येथे उपलब्ध आहे. तसेच हातपाटी/ डुबी रेती गटाचा सविस्तर तपशिल उपविभागीय अधिकारी/तहसिलदार कार्यालयाच्या नोटीस बोर्डावर व खनिकर्म कार्यालयाच्या https://ratnagiri.gov.in या संकेत स्थळावर उपलब्ध आहे. तरी इच्छुकांनी जिल्हाधिकारी कार्यालय जुनी प्रशासकिय इमारत, तळ मजला (खनिकर्म शाखा) येथे जाहिरात प्रसिध्द झाल्यापासून 31 मे 2023 पर्यंत अर्ज करावेत. तसेच परवान्याची मुदत 09 जून 2023 पर्यंतच वैध राहिल, असे अपर जिल्हाधिकारी रत्नागिरी यांनी कळविले आहे.


