तुम्ही तयारीला लागा, यंदाचा दसरा मेळावा शिवतीर्थावरच होणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे आदेश

0
16

मुंबई- दसरा मेळावा कोणाचा आणि कुठे होणार? सध्या राजकीय वर्तुळात याचीच चर्चा जोरदार सुरु आहे. यंदाचा दसरा मेळावा शिवतीर्थावर जोरात साजरा होणार, लवकरच परवानग्या मिळतील, त्यामुळे तुम्ही तयारीला लागा अशा सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी कार्यकर्त्यांना दिल्या आहेत. तसेच कोणीही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल असं वागू नका, अशी तंबी देखील सदा सरवणकरांच्या गोळीबार प्रकरणानंतर मुख्यमंत्र्यांनी दिली आहे.

यंदाचा दसरा मेळावा शिवतीर्थावरच होणार

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतल्या बंडखोर गटाचा दसरा मेळावा कुठे आणि कसा घ्यायचा याविषयी निर्णय घेण्यासाठी आज मुंबईत बैठकीचं आयोजन करण्यात आलंय. चर्चगेट येथील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानसमोरील महिला आर्थिक विकास महामंडळाच्या वास्तूत ही बैठक झाली. या बैठकीत एकनाथ शिंदे यांनी आदेश दिले आहेत. एकनाथ शिंदे म्हणाले, आपण यंदा दसरा मेळावा जोरात साजरा करायचा आहे. आपल्याला लवकरच परवानगीही मिळेल त्यामुळे तुम्ही तयारीला लागा. मला एक वर्ष दसरा मेळाव्याची जबाबादारी दिली होती त्यावेळी मी मैदानात मुंगीही शिरणार नाही एवढी गर्दी जमवली होती. दसरा मेळावा शिवतीर्थावर जोरात साजरा होणार, लवकरच परवानग्या मिळतील, त्यामुळे तुम्ही तयारीला लागा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here