सिंधुदुर्ग- संत राऊळ महाराज महाविद्यालयात हिंदी दिन साजरा.

0
30

प्रतिनिधी -अभिमन्यू वेंगुर्लेक
कुडाळ संत राऊळ महाराज महाविद्यालयांच्या हिंदी विभागातर्फे महाविद्यालयात हिंदी दिनाचे आयोजन करण्यात आले होते.या दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात फोंडाघाट काॅलेजचे हिंदी विभाग प्रमुख डॉ.संतोष रायबोले यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते या कार्यक्रमासाठी की.म.शि.प्र.मंडळाचे सरकार्यवाह मा.अनंत वैद्य हे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते महाविद्यालयाचे प्र.प्राचार्य डाॅ.व्ही.बी.झोडगे कार्यक्रमाचे अध्यक्ष होते.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला महाविद्यालयाचे हिंदी विभाग प्रमुख डॉ.कॅप्टन एस.टी.आवटे यांनी कार्यक्रमाला उपस्थित मान्यवरांचे स्वागत करून प्रास्ताविक मांडले.ते म्हणाले की आज देशभरात हिंदी दिन साजरा केला जात आहे.देशाच्या साहित्य संस्कृती पासून ते स्वतंत्र लढ्या पर्यंत हिंदीने आपले योगदान दिलं आहे. हिंदी दिनानिमित्त या कार्यक्रमांमध्ये उपस्थित प्रमुख पाहुणे श्री अनंत वैद्य यांनी हिंदी भाषे मध्ये रोजगाराच्या अनेक संधी आहेत विद्यार्थ्यांनी त्याचा लाभ घ्यावा असे सुचित केले. कार्यक्रमाचे मुख्य मार्गदर्शक डॉ. संतोष रायबोले यांनी हिंदी भाषेचा इतिहास, संत कबीर चे विश्वाला दिलेला संदेश तसेच आजच्या पिढीने हिंदीच्या माध्यमातून अनेक रोजगार उपलब्ध आहे त्याचा फायदा करून घेण्याची सूचना केली.

कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. झोडगे यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतात हिंदी दिनाच्या सर्वांना शुभेच्छा देत हिंदी आपली राष्ट्रभाषा आहे त्याचा सर्वांना अभिमान बाळगला पाहिजे असे सांगितले तया कार्यक्रमात डॉ.व्ही.जी. भास्कर यांनीही हिंदी दिनाच्या शुभेच्छा देत हिंदी भाषेचे महत्व सांगितले कार्यक्रमाच्या शेवटी मराठी विभाग प्रमुख डॉ. एस. के. असोलकर यांनी उपस्थितांचे आभार मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.आवटे यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here