सिंधुदुर्ग: शिवसेनेतर्फे वेंगुर्ल्यात वेदांत कंपनीचा प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातला नेल्याच्या निषेधार्थ स्वाक्षरी मोहिम

0
28

वेंगुर्ला प्रतिनिधी – महाराष्ट्रच्या १ लाख तरुणांना रोजगार मिळवून देणारा वेदांत कंपनीचा १.४५ लाख कोटींचा प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातला गेल्याने शिवसेना व युवासेनेच्यावतीने निषेध करण्यात आला. यावेळी शिवसेना तालुका कार्यालयासमोर सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.तसेच निषेध स्वाक्षरी मोहिमही राबविण्यात आली.

यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते, तालुकाप्रमुख यशवंत परब, उपतालुकाप्रमुख उमेश नाईक, शहरप्रमुख अजित राऊळ, युवासेना तालुकाप्रमुख पंकज शिरसाट, महिला तालुका संघटक सुकन्या नरसुले, माजी नगरसेवक तुषार सापळे, वेदांग पेडणेकर, समृद्धी कुडव, मेरी फर्नांडीस, मनाली हळदणकर, वैभव फटजी, वेदांत वाडेकर, चिन्मय डुबळे, वेंगुर्लेकर, किरण सावंत, कांता घाटे, सुहास मेस्त्री, अभि मांजरेकर, संतोष कुडव आदींसह शिवसैनिक, युवासैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

फोटोओळी – वेदांत कंपनीचा प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातला नेल्याच्या निषेधार्थ वेंगुर्ला शिवसेनेतर्फे सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here