कलिना येथील सैनिकी मुलींचे वसतिगृहात ” अशासकीय कर्मचारी “या पदासाठी अर्ज करण्याचे आवाहन

0
48
RITES लिमिटेडमध्ये 400 सहाय्यक व्यवस्थापक पदांसाठी मेगा भरती; ऑनलाइन अर्ज सुरू
RITES लिमिटेडमध्ये 400 सहाय्यक व्यवस्थापक पदांसाठी मेगा भरती; ऑनलाइन अर्ज सुरू

मुंबई, दि. १६ : कलिना येथील सैनिकी मुलींचे वसतिगृहात तात्पुरत्या स्वरूपात कंत्राटी पद्धतीने एक अशासकीय कर्मचारी नेमणूक करण्यात येणार आहे.या पदासाठी अर्ज करण्याची मुदत २३ सप्टेंबरपर्यंत आहे. इच्छुक उमेदवारांनी या पदासाठी अर्ज करण्याचे आवाहन मुंबई उपनगरचे जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, मेजर प्रांजळ जाधव (निवृत्त) यांनी प्रसिद्धीस दिले आहे.
या पदासाठी अर्जदाराची पात्रता निकष
– या पदासाठी अर्जदार ही युद्ध विधवा किंवा सैन्य सेवेत मृत्यू पावलेल्या सैनिकाची पत्नी किंवा माजी सैनिक / आजी सैनिक यांची पत्नी असावी (युद्ध विधवेस/विधवेस प्राधान्य).
– अर्जासोबत युध्द विधवा/विधवा/माजी सैनिक/आजी सैनिक पत्नी असल्याचे प्रमाणपत्र आणि शैक्षणिक प्रमाणपत्राच्या छायांकित प्रती जोडणे आवश्यक आहे.
– शिक्षण – एस.एस.सी. उत्तीर्ण., एम.एस.सी.आय.टी. उत्तीर्ण आणि टायपिंग येणाऱ्यास प्राधान्य.
– वयोमर्यादा – ३० ते ५० वर्ष,
– मानधन रू. – १७ हजार ८२३ दरमहा.
– अर्जाचा करण्याचा अंतिम दिनांक २३ सप्टेंबर असून मुलाखत २७ सप्टेंबर रोजी होणार आहे.
तरी इच्छुक व पात्र महिला उमेदवारांनी अर्ज करावेत, असे आवाहन मेजर जाधव (निवृत्त) यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.

त्यासाठी पत्रव्यवहार आणि संपर्काचा पत्ता – जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, द्वारा सैनिकी मुलींचे वसतिगृह, एडब्लूडब्लूए डायमंड वसतीगृहाच्या पाठीमागे, कलीना मुंबई विद्यापीठ उत्तर गेट समोर, सांताक्रुझ पूर्व, मुंबई – ४०००५५ दूरध्वनी – ०२२-३५०८३७१७, ई-मेल [email protected] येथे संपर्क साधावा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here