कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे नागरिक मोठ्या प्रमाणावर बाधित होत आहेत. तालुका प्रशासन आणि आरोग्य यंत्रणा कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी रात्रंदिवस प्रयत्न करीत आहेत. नागरिकांनीही या उपाययोजनांमध्ये सहकार्य करण्याचे आवाहन करतानाच, आजाराची लक्षणे आढळून आल्यास तात्काळ आरोग्य यंत्रणेशी संपर्क साधावा असे आवाहन महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले.
कोविड केअर सेंटर येथे कार्यरत आरोग्य यंत्रणेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी कोविड रुग्णांची मानवतेच्यादृष्टीने सेवा करावी अशी सूचना मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केली. खासदार सदाशिव लोखंडे यांनी तालुक्यातील आरोग्य यंत्रणेने सतर्क राहून कोविडबाधित रुग्णांवर योग्य उपचार करावा अशी सूचना केली. साईसंस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी कान्हुराज बगाटे यांनी रुग्णालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी रुग्णांशी सौजन्याने वागावे असे सांगितले. उपविभागीय अधिकारी गोविंद शिंदे यांनी प्रशासनातर्फे करण्यात आलेल्या उपाययोजनांची माहिती सादर केली.
20People Reached1EngagementBoost Post
11