रत्नागिरी– समुद्रात मासेमारीसाठी जाणाऱ्या मच्छीमारांना क्युआर कोड पीव्हीसी आधारकार्ड अत्यावश्यक केले आहे. पुढील महिन्यातील पहिल्या आठवड्यापासून याची कडक अंमलबजावणी केली जाणार आहे. खलाशी, मच्छीमारांचे आधारकार्ड क्युआर कोड तयार करण्यासाठी मत्स्य विभागाकडून नोंदणी सुरू झाली आहे. आतापर्यंत १४ हजार ५७ मच्छीमारांची नोंद झाली आहे. सागरी सुरक्षेच्यादृष्टीने शासनाच्या आदेशानुसार हे पाऊल उचलले आहे. दहशतवादी कारवायांसाठी कोकणातील समुद्र किनाऱ्याचा वापर झाल्याचे वारंवार स्पष्ट झाले आहे. त्यामुळे सागरी सुरक्षेला महत्त्व प्राप्त झाले असून केंद्र शासनाकडून विविध उपाययोजनाही केल्या जात आहेत


