46 लाख 69 हजार रूपयाच्या मुद्देमालासह सावंतवाडील युवकाला घेतले ताब्यात.राज्य उत्पादन शुल्क विभाग कोल्हापूर पधकाने केली कारवाई
संजय भाईप (सावंतवाडी )
सावंतवाडी: गोव्याहुन कोल्हापूर येथे गोवा बनावटीची चोरटी दारू येणार असल्याची पक्की खबर राज्य उत्पादन शुल्क विभागाला मीळाल्याने आयुक्त कांतीलाल उमापसो, संचालक सुनिल चव्हाणसो, विभागीय उप आयुक्त बि.एच.तडवी यांच्या मार्गदर्शनाखाली कोल्हापूर करवीर भोगावती येथे सापळा रचुन वहानानची कसुन तपासणी करत असताना टाटा कंपनीचा 1109 हा सहाचाकी टेम्पो आला असता टेम्पोची झडती घेतली असता टेम्पोच्या हौद्यामध्ये पुठ्याच्या खोक्यामध्ये गोवा बनावटीची चोरटी दारू सापडुन आली.
या चोरट्या वहातुकीवर कारवाई करून 46 लाख 69 हजार रूपयाच्या मुद्देमालासह सावंतवाडी चराठा येथील संशयीत नितीश रमेश तांबोसकर वय वर्षे 33 याला ताब्यात घेतले.सदरची कारवाई निरिक्षक एस.जे.डेरे,दुय्यम निरीक्षक आर.जी.येवलुजे, काॅ.विलास पवार,संदिप जानकर,शंकर मोरे,दिपक कापसे,योगेश शेलार यांनी केली.


