सिंधुदुर्ग: सहज सुलभ जात प्रमाणपत्र पडताळणी या विषयावर टोपीवाला ज्यु. कॉलेज, मालवण येथे मार्गदर्शन

0
20

मालवण: ना. अ. दे. टोपीवाला ज्यु. कॉलेज, मालवण, ता. मालवण, जि. सिंधुदुर्ग येथे दि. २० सप्टेंबर २०२२ रोजी ११ वी व १२ वी सायन्स च्या विद्यार्थ्यांना जात प्रमाणपत्र पडताळणी बाबत सहज सुलभ जात प्रमाणपत्र पडताळणी या विषयावर जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीतीचे व्यवस्थापक संतोष कदम, यांनी मार्गदर्शन केले.

-त्यामध्ये मानीव दिनांका पुर्वीच्या जातनोंद असणाऱ्या पुराव्यांना अधिक महत्त्व आहे. विद्यार्थ्यांनी प्रथम ऑनलाईन अर्ज भरून त्याची सॉफ्ट कॉपी व सेवा शुल्क (मात्र १०० /-रूपये) भरल्याची पावती समिती कार्यालयात जमा करावी. -अर्जदार, त्यांचे पालक किंवा कॉलजचे प्रतिनिधी यांनीच पडताळणी साठीचा अर्ज समिती कार्यालयात जमा करावा. -अर्जासोबत नमुना नं. १७ चे शपथपत्र व नमुना नं.३ चे योग्य वंशावळ नमुद असणारे शपथपत्र सादर करावे. – -अर्जदार यांनी मानीव दिनांकापुर्वी जातनोंद असणारे पुरावे सादर करावे, अशी माहिती दिली.

या कार्यक्रमास कॉलेजचे प्राचार्य, खानोलकर व शिक्षकवृंद उपस्थित होते. त्यांनी सर्व विद्यार्थ्यांना ३० नोव्हेंबर २०२२ पर्यंत जात प्रमाणपत्र पडताळणी करीता अर्ज सादर करण्याबाबत आवाहन केले. तसेच महाविद्यालयातील १२ वी च्या विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले. हा कार्यक्रम पार पाडण्याकरीता जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे अध्यक्ष, डॉ. भरत बास्टेवाड, उपायुक्त, प्रमोद जाधव, व संशोधन अधिकारी सहाय्यक आयुक्त सचिन साळे यांचे मार्गदर्शन लाभले. सोबत :-फोटो जोडले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here