‘डॉक्टर जी’ चित्रपटात अभिनेता आयुष्मान खुराणा गायनोकॉलजिस्टच्या प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. डॉ. उदय गुप्ताच्या भूमिकेत दिसणाऱ्या आयुष्मान खुराणाचे चाहत्यांकडून भरभरून कौतुक होत आहे. चित्रपटाचा ट्रेलर रिलीज होताच तो सोशल मीडियावर झपाट्याने व्हायरल झाला आहे . आता चित्रपट कधी रिलीज होतो, याची प्रेक्षकांना उत्सुकता लागली आहे. डॉक्टर जी चित्रपट 14 ऑक्टोबरला चित्रपटगृहात झळकणार असून या चित्रपटात आयुष्मानसोबत एक्ट्रेस रकुल प्रीत सिंह आणि शेफाली शाह प्रमुख भूमिकेत दिसणार आहे.


