यावर्षी भारतातून ‘ऑस्कर’ नामांकनासाठी गुजराती चित्रपटाची निवड करण्यात आली आहे. ‘चेल्लो शो’ असे या गुजराती चित्रपटाचे नाव आहे. या चित्रपटाला भारताचे २०२३ चे अधिकृत ऑस्कर नामांकन मिळाले आहे. फिल्म फेडरेशन ऑफ इंडियाने मंगळवारी ही घोषणा केली. भारताने ऑस्करमध्ये अधिकृत प्रवेश पाठविला आहे. अकादमी 23 जानेवारी 2023 रोजी नामांकनाची अंतिम यादी जाहीर करेल. त्यानंतर मतदान सुरू होईल. 12 मार्च 2023 रोजी (भारतात 13 मार्च) 95 वा ऑस्कर सोहळा प्रसारित केला जाईल.


