Sindhudurg : बांदा दाणोली मार्गे विलवडे व वाफोली येथे रस्त्याची दयनीय अवस्था

0
46
बांदा दाणोली मार्गे विलवडे व वाफोली येथे रस्त्याची दयनीय अवस्था

संजय भाईप (सावंतवाडी)

बांदा दाणोली मार्गे विलवडे व वाफोली येथे रस्त्याची दयनीय अवस्था झाली असून जांभळी बस स्टाँप समोर मोरीवर भगदाड पडून रस्ता खचला आहे. रस्ता वाहतुकीसाठी धोकादायक बनला असून अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे. अनेक ठिकाणी मोरी पुल खचली असून भगदाड पडून मार्ग वाहतुकीस धोकादायक बनला आहे.
विलवडे जांभळी स्टाँप समोरील मोरीपुलाला रस्त्यांवर भगदाड पडले असून अपघातजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. बांधकाम विभागाच्या दुर्लक्षामुळे अशा धोकादायक मोरीपुलांना भगदाड पडत असल्याचा आरोप ग्रामस्थांमधून होत आहे. तसेच प्रशासनाने अपघात टाळण्यासाठी तात्काळ उपाययोजना करण्याची मागणीही ग्रामस्थांनी केली आहे. बांदा दाणोली मार्ग हा गोव्यात जाण्यासाठी जवळचा मार्ग आहे. या मार्गावर रात्रंदिवस वाहतूक सुरू असते. समोरून येणाऱ्या वाहनाला बाजू देताना नवख्या वाहनचालकाला भगदाड दृष्टीस न पडल्यास मोठा अपघात होण्याची शक्यता आहे. त्यामुळे कोणतीही हानी होण्याअगोदर सार्वजनिक बांधकाम विभागाने याकडे लक्ष देऊन उपाययोजना करण्याची मागणी वाहनचालक, प्रवासी, नागरिकांमधून होत आहे.

  

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here