Sindhudurg: आ. वैभव नाईक, सतीश सावंत, संजय पडते यांची जि.प.मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांसमवेत बैठक संपन्न

0
16
आ. वैभव नाईक, सतीश सावंत, संजय पडते यांची जि.प.मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांसमवेत बैठक संपन्न

जिल्ह्यातील प्रलंबित विकास कामे व सरपंच, लोकप्रतिनिधींच्या समस्यांकडे जि.प.मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचे वेधले लक्ष

प्रतिनिधी- पांडूशेठ साठम

कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक व माजी जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत , शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते यांनी आज सिंधुदुर्ग जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजीत नायर यांची भेट घेत विविध योजनांच्या कार्यवाही बाबत चर्चा केली. यामध्ये जलजीवन मिशन, २५/१५ ग्रामविकास निधी, आमदार स्थानिक विकास निधी, जिल्हा वार्षिक योजनेच्या विविध प्रलंबित कामांचा आढावा घेतला.

त्याचबरोबर राज्य सरकारने स्थगिती दिलेल्या विकास कामांबाबत विचारणा करण्यात आली. शाळांमध्ये शिक्षकांच्या नेमणुकीबाबत चर्चा करण्यात आली. ज्या ठिकाणी शिक्षकांची कमतरता आहे त्या शाळेत शिक्षक देण्याची मागणी करण्यात आली. यावेळी सरपंच लोकप्रतिनिधी यांनी आपल्या समस्या मांडल्या. त्या सोडविण्याची सूचना आ. वैभव नाईक यांनी केली.त्याबाबत योग्य ती कार्यवाही करून समस्या मार्गी लावण्यात येणार असल्याचे प्रजीत नायर यांनी सांगितले.

यावेळी माजी जी.प. सदस्य राजू कविटकर, अतुल बंगे, आकेरी सरपंच महेश जामदार, हुमरस सरपंच अनुप नाईक, हेदूळ सरपंच नंदू गावडे, भडगाव उपसरपंच बाबी गुरव, वडाचापाट ग्रा. प. सदस्य अनंत पाटकर, पांडुरंग गावडे, बाबू टेंबुलकर, जी. प. बांधकाम कार्यकारी अभियंता श्री. आवटे, व जिल्हा परिषदच्या विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

          

          

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here