▪️कोस्ट गार्ड, मालवण तहसील प्रशासनाचे आयोजन;पार्थ समुद्रात तेलवाहू जहाज बुडाल्याने प्रशासनाचे प्रयत्न..
प्रतिनिधी- अभिमन्यू वेंगुर्लेकर
मालवण विजयदुर्ग – देवगड दरम्यानच्या समुद्रात पार्थ हे तेलवाहू जहाज बुडल्यानंतर त्यातून तेल गळती सुरू होऊन समुद्रात व किनाऱ्यावर तेल प्रदूषणाचा धोका निर्माण झाल्याने याबाबत करावयाच्या उपाययोजना बाबत आज मालवण तहसील प्रशासन व कोस्ट गार्डमार्फत चिवला बीच येथे रंगीत तालीम घेण्यात आली. यावेळी कोस्ट गार्ड रत्नागिरीचे सहायक कमांडींग ऑफिसर सचिन सिंग यांनी यावेळी मार्गदर्शन करत समुद्राच्या पाण्याच्या सध्याच्या प्रवाहाबरोबर हे तेल पुढे सरकल्यास त्याचा मालवण किनारपट्टीला जास्त धोका निर्माण होऊ शकतो, त्यासाठी नागरिकांनी तत्पर राहावे, असे सांगितले. तर तेलगळती बाबत प्रशासनाने दिलेल्या माहिती व्यतिरिक्त इतर कोणत्याही अफवांवर नागरिकांनी विश्वास ठेवू नये, असे आवाहन तहसिलदार अजय पाटणे यांनी यावेळी केले.


