प्रतिनिधी- अभिमन्यू वेंगुर्लेकर
जिल्ह्यात पसरलेली अफवा माहीत असूनही त्याला खत पाणी घालणाराच जबाबदार नाही का? – मुलांच्या पालकांची यात काय चुक? – –
कुडाळ -जिल्ह्यात सोशल मिडीयावर मुलांना पळवून नेणारी टोळी सक्रिय असल्याचे मॅसेजने धुमाकूळ माजवला असताना त्या मुळे पालक ,शिक्षक,विद्यार्थी यांनी या अफवांची धास्तीच घेतली आहे. त्यामुळे कुडाळ तालूक्यातील आंदुर्ले गावात घडलेल्या नाट्यमय घडामोडी मुळे मात्र संपूर्ण जिल्हाच काही तासांसाठी हादरलाच !जिल्ह्याच्या संपूर्ण पोलिस यंत्रणेची तारांबळ उडाली. जिल्ह्यात काही तासात नाकाबंदी करून तपास कामाला वेग देण्यात आला. कर्तव्य दक्ष पोलीसांनी काही तासांच्या आत घडलेल्या घटणेचा शोध घेतला आणि जिल्हा शांत झाला. शाळकरी मुलांनी गाडीचे केलेले वर्णन आणि गाडीचा नंबर या मुळे पोलिसांना तपास करणे सोपे गेले हेही तितकेच खरे आहे. –
* घडलेली घटना तपशील –
निवती पोलिस ठाणे हद्दीत आंदुर्ले या गावी एक लाल पांढऱ्या रंगाची गाडी नं 𝙼𝙷 04 D- 9655( पूर्ण माहीत नाही ) सदर गाडीत 02 इसम असून ते आंदूर्ले गावी एका शाळेजवळ शाळेतील मुलांना चॉकलेट देण्याचे आमिष दाखवत होते. सदर घटना पालक यांनी पाहताच सदरचे दोन्ही इसम गाडी घेऊन वेंगुल्याच्या दिशेने पळून गेलेले आहेत तरी वरील नमूद वर्णनाची गाडी आपल्या हद्दीत मिळून आल्यास तात्काळ कंट्रोलशी संपर्क करावा. तसेच आपापल्या हद्दीतील शाळेमध्ये लक्ष ठेवून राहायचे आहे असे कंट्रोल करून कळवलेले आहे हा मॅसच क्षणात व्हायरल झाला आणि जिल्हा हादरला.
एक ओमनी कार आंदुर्ले गावात दाखल झाली. आंदुर्ले गावच्या ग्रामपंचायतीच्या व बाजारपठेच्या मध्यावर थांबवून या गाडीतील इसम मुलांना चाॅकलेट देत होता. पण मुलांनी नकार दिला. मुलांच्या मागून त्यांचे पालक येत होते. त्यांना त्या मुलांनी घडलेला प्रकार पालकांना सांगितला. सोशल मिडीच्या व्हायरल मॅसेजमुळे आधीच हादरलेल्या पालकांनी आंदुर्ले गावच्या प्रथम नागरीक सरपंच सायबा यांच्याशी संपर्क साधला. तेव्हा सरपंच या नात्याने त्यानी निवती पोलिसठाणे यांना कळवले. मग निवती पोलिसानी घटनास्थळी जाऊन ग्रामस्थांची तक्रारीची दखल घेतली आणि सदर घटना वरिष्ट स्थरावर कळवल्याने जिल्हात नाकाबंदी करून मुलांनी व त्यांच्या पालकांनी वर्णन केलेल्या ओमनी कारचा लाल रंग व नंबर प्लेट नंबर तपासणी केली.
त्यात वेंगुर्ला पोलिसानी केलेल्या तपासात सत्य उघडकीस आले ते असे की,निवती पोलीस ठाणे हद्दीत आंदूरले गावात मारुती ओमनी कार मधून अज्ञात इसमाने शाळेतील मुलांना चॉकलेट देण्याच्या बहाण्याने जवळ बोलावून केलेल्या प्रकाराच्या अनुषंगाने सदर वाहन क्रमांक MH-04-D-9655 या वाहन मालकाचा शोध घेतला असता सदर इसम हा वेंगुर्ला पोलीस ठाणे हद्दीत राहणार कृष्णा भिकाजी गावडे, वय सुमारे 60 वर्षे रा. अनसुर, देउलवाडी ता वेंगुर्ला येथील असल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे अनसुर गावचे संजय गावडे (उपसरपंच अनसुर) यांच्या सोबत सदर इसमाकडे चौकशी करता त्याला लहान मुलाला चॉकलेट देण्याची व देवाचा प्रसाद वाटण्याची सवय असल्याचे सांगितले. तसेच आपण आज रोजी आंदूरले गावात गेलो असताना तेथील मुलांना चॉकलेट देऊ केले होते. परंतु त्याबाबत आपला कोणताही वाईट हेतू नसल्याचे सांगितले आहे. सदर बाबत खात्री करता मुलांना पळविण्यासारखा कोणताही प्रकार नाही. त्याबाबत कृष्णा भिकाजी गावडे यांना असे न करण्याबाबत समज दिलेली आहे.
पोलिस निरीक्षक अतुल जाधव
वेंगुर्ला पोलिस ठाणे जाहीर केल्याने सर्वानी सुटकेचा श्वास घेतला. नाका बंदी हटवली गेली आणि जिल्हात मुल पळवणारी टोळी असल्याच फोल ढरल ती अफवा होती असच सिध्द झाल अस लोक व पोलीस म्हणत असतील तर हे खर नाही कारण ‘लांडगा आला रे आला’ का घडू शकत नाही याचा विचार व्हायलाच हवा. तसच आंदुर्ले ग्रामस्थांनी कोणतीही अफवा मुळात पसरवली नाही कारण सोशल मिडीयावर जे वाचल ते गृहीत धरून ते तसे वागलेत त्याच प्रमाणे गावचे प्रथम नागरीकही वागलेत याच घटनेतील खरा दोषी आहे तो ओमनी कार वालाच कारण त्याची मानसिकता कारण सदर ओमनी वाला जिल्हात दुकानदारांना जनरल किराणा माल पोचवतो असे समजते ( मग या घट नंतर गावातील तर दुकान दाराना माल न टाकताच पसार का झाला? ) जिल्हात काही दिवसांपासून मुल पळवित असल्याचा मॅसेच व्हायरल होत असल्याचे त्यालाही माहीत असावे, असलेच पाहीजे याची मानसिकता काही विषिप्त असल्याने या गोष्टीचा फायदा उठवून निवळ आनंद लूटण्याच्या हेतूने मुदाम गाडी थांबवून असे प्रकार करून दहशत निर्माण करीत होता हे नाकारता कसे येवू शकते? याचा विचार करायलाच हवा .कारण व्हायरल प्रकरण जिल्हात पसरल असताना त्यात नाहक कोणी आपला बळी देईल का ? याचा विचार व्हायलाच हव…सदर ओमनी कारवाला चाॅकलेट वाटण्याच्या बहाण्याने जवळ बोलवतो अशी घटना घडली होती या संदर्भात शाळेच्या शिक्षकांनी वेंगुर्ला पोलिस स्टेशन गाठले होते त्याचा निकाल या घटणेशी मिळता जुळता आहे) आंदुर्ले गावात घटना घडण्यापूर्वी वेंगुर्ला येथे अशीच घटना घडली होती. सदर शिक्षकांनी पोलिसांना खबर दिली होती. त्यावर वृत्तपात्रातून व डीजीटल वृत्तबातमी प्रसिद्ध झाल्या होत्या. या समजून घेवून मुलांना चाॅकलेट देण्याचे चाळे संबंधीत व्याक्तीने थांबवायला हवे होते. पण तस घडलेल नाही त्यांने थांबवलेल नाही त्याला त्यात आंनंद वाटला आणि संपूर्ण पोलिस यंत्रणेला कामाला लावली आंदुर्ले नागरीकांनी नाहक बळी पडले ते सोशलमिडीयाच्या मॅसेजला! त्यांचाही यात काही चुकलेल नाही मुलाच्या संरक्षणाची जबाबदारी पालकांचीच असते ना मग ते काळजी घेणारच. त्याच बरोबर शाळेच्या शिक्षकांच तसेच गावच्या प्रथम नारिकांचही पोलिसांना प्रचारण करून संबधीत घडलेल्या घटणेची तक्रार देण माहीती देण काहीच चुकलेल नाही. यात सर्वस्वी जबाबदार आहे तो दानशूर चाॅकलेट वाटणारा. कारण जिल्हात काय घडतेय, काय पसरतेय याची जाणिव असतानाही तो आपला व्यावसाय टाकून वाटेत मुद्दाम तो, नातेवाईक असल्याने. पडदा टाकण्याचा प्रयत्न चाललाय सगळा मग कित्तेक वर्षे हा माणूस किराणा माल जिल्हात पुरवतोय कधी एेकीव्यात आल नाही की हा माणूस मुलांना चाॅकलेट शाळेच्या आवारात आसपास वाटतोय याची …समस्त पत्रकारांनी मुलप्रेमीची वार्ता छापली असती …नाही का?तर अस काही नाही सदर व्याक्ती मिलेक्टरी रिटायर्ड असल्याचे समजते खर की खोट ते माहीत नाही पण जिल्हात सोशल मिडीयावर व्हायरल होत असलेल्या मॅसेजचा फायदा या कथाकथीत एक्स मेलेर्टीयनने फायदा ऊठवून पोलिस यंत्रणेला कामाला लावल एवढ नक्की .जिल्हातील गावागावात हाच चर्चेचा विषय आहे एवढ नक्की!


