मुबंई- ऑक्टोबर महिना हा असा महिना आहे, ज्यात दसरा, दिवाळी येत आहे. यामुळे या महिन्यात देशभरातील राज्यांच्या सुट्ट्यांचा विचार करत महिन्याच्या जेवढे दिवस बँका सुरु असतात तेवढे दिवस बँका बंद राहणार आहेत. यामुळे तुम्हाला तुमच्या ठिकाणानुसार सुट्ट्या आणि बँकांचे नियोजन करावे लागणार आहे.
ऑक्टोबर महिन्यात महाराष्ट्रसह विविध राज्यांत २१ दिवस बँका बंद असणार आहेत. म्हणजेच १० दिवस बँकांचे कामकाज सुरळीत सुरु असणार आहे. एवढे दिवस बँका बंद असल्याने या उरलेल्या कामाच्या दिवशीदेखील बँकांत गर्दी होण्याची शक्यता आहे. कारण याच महिन्यांत करोडो लोकांच्या खात्यात त्यांच्या त्यांच्या कंपन्यांचा बोनस जमा होणार आहे.
RBI ने ऑक्टोबर महिन्याच्या बँक सुट्ट्यांची यादी जाहीर केली आहे. राज्यानुसार काही प्रादेशिक सुट्ट्या यात आहेत. मात्र, सार्वजनिक सुट्ट्यांच्या दिवशी देशभरातील बँका बंद राहणार आहेत.


