राज्यातील 1 हजार 165 ग्रामपंचायतींसाठी 13 ऑक्टोबर ऐवजी 16 ऑक्टोबरला होणार मतदान

0
19

मुंबई- राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकीबाबत महत्त्वाची बातमी आहे. विविध 18 जिल्ह्यांतील 82 तालुक्यांमधील 1 हजार 165 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी 13 ऑक्टोबर 2022 ला मतदान होणार नाही. हे मतदान आता 16 ऑक्टोबर 2022 रोजी मतदान होईल. तर मतमोजणी 17 ऑक्टोबर 2022 रोजी होईल, अशी माहिती राज्य निवडणूक आयोगाने म्हटले आहे.

थेट सरपंचपदाचाही समावेश : राज्य निवडणूक आयोगाने 07 सप्टेंबर 2022 रोजी 1 हजार 166 ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला होता. त्यात सदस्यपदांसह थेट सरपंचपदाचाही समावेश आहे. सुधारित कार्यक्रमानुसार 16 ऑक्टोबर 2022 रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत मतदान होईल. नक्षलग्रस्त भागात दुपारी 3 वाजेपर्यंतच मतदानाची वेळ असेल. मतमोजणी 17 ऑक्टोबर 2022 रोजी होईल. मतमोजणीचे ठिकाण व वेळ संबंधित तहसीलदार जिल्हाधिकाऱ्यांच्या मान्यतेने निश्चित करतील, असेही आयोगाने म्हटले आहे.

17 ऑक्टोबरला कळणार निकाल- राज्यातील 18 जिल्ह्यांमधील 1166 ग्रामपंचायत मध्ये येत्या 13 ऑक्टोबरला निवडणूक होणार असल्याची घोषनाझाली होती.तर 14 ऑक्टोबर 2022 रोजी मतमोजणी होती. निवडणूका होणाऱ्या ग्रामपंचायती संदर्भात संबंधित तहसीलदार निवडणुकीची अधिसुचना प्रसिद्ध करतील. त्यानंतर नामनिर्देशनपत्र दाखल करण्यात येईल. त्यानंतर नामनिर्देशनपत्रांची छाननी होईल. नामनिर्देशनपत्र मागे घेण्यासाठी मुदत देण्यात येईल. ते मागे घेतल्यानंतर उरलेल्या उमेदवारांना त्याच दिवशी निवडणूक चिन्हांचे वाटप होणार आहे. सुधारित कार्यक्रमानुसार 16 ऑक्टोबर 2022 रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत मतदान होईल. तर 17 ऑक्टोबर 2022 रोजी मतमोजणी होणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here