Bollywood: दीपिका पादुकोण ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये दाखल

0
72

दीपिका पादुकोणला ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. दीपिकाची प्रकृती खालावल्यानंतर तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. दीपिकाची प्रकृती ठिक असल्याच्या बातम्या समोर येत आहेत. ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये दीपिकावर उपचार करण्यात येत आहेत. दीपिकाला हार्ट अरिथमीया नावाचा आजार आहे.

दीपिकाची तब्येत अचनाक बिघडण्याची ही दुसरी वेळ आहे. त्यावेळी हृदयाची धडधड किंवा हृदयाचे ठोके वाढल्यामुळे दीपिकाला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यावेळी दीपिका हैदराबादमध्ये प्रभाससोबत तिच्या आगामी ‘प्रोजेक्ट के’ चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त होती. तेव्हा दीपिकाला अर्धा दिवस निरीक्षणाखाली ठेवण्यात आले होते.

मात्र दीपिका आता बरी असल्याचे पिंकविलाच्या रिपोर्टमध्ये म्हटले आहे. तिची तब्येत ठिक असून चाहते दीपिका बरी होण्यासाठी शुभेच्छा देत आहेत. वैद्यकीय भाषेत सांगायचे तर या आजारामुळे यापूर्वी अनेक सेलिब्रिटींचा मृत्यू झाला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here