वेंगुर्ले प्रतिनिधी: बॅरिस्टर नाथ पै फाउंडेशन फॉर कोकण डेव्हलपमेंट मुंबई, बॅरिस्टर नाथ पै शिक्षण संस्था सिंधुदुर्ग कुडाळ व व्हिक्टर डांट्स लॉ कॉलेज कुडाळ यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार एक ऑक्टोबर रोजी सकाळी १०.३० ते १२.३० वा. वेंगुर्ले मधुसूदन कालेलकर सभागृह येथे बॅरिस्टर नाथ पै जन्मशताब्दी सोहळा आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमास वेंगुर्लेवासियानी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन बॅरिस्टर नाथ पै फाउंडेशनच्या अदिती पै यांनी वेंगुर्ले येथे केले.
वेंगुर्ले येथे आज अदिती पै यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. यावेळी राष्ट्रवादीचे नेते व्हीकटर डांट्स, बॅ. नाथ पै स्कूल चेअरमन उमेश गाळवणकर, अदिती पै, अद्वैत पै, सचिन वालावलकर आदी उपस्थित होते.यावेळी बोलताना अदिती पै म्हणाल्या की, शनिवारी होणाऱ्या हा कार्यक्रम राष्ट्रवादीचे अध्यक्ष तथा खासदार शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली होणार असून या कार्यक्रमास शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर, उद्योग मंत्री उदय सामंत, खासदार विनायक राऊत, पालकमंत्री रविंद्र चव्हाण, आमदार वैभव नाईक ,नितेश राणे व अन्य मान्यवर आदी उपस्थित राहणार आहेत.बॅ नाथ पै स्मारक उभारण्यात येत असून नाथ पै फाउंडेशन च्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येणार आहेत, असे अदिती पै यांनी सांगितले.
फोटो : पत्रकार परिषदेत बोलताना अदिती पै सोबत अन्य

