Sindhudurg: वेंगुर्ले येथेही शिवसेना शिंदे गट सक्रिय

0
30

माजी खा.कर्नल सुधीर सावंत यांच्या उपस्थितीत कार्यकर्त्यांचा प्रवेश

वेंगुर्ला प्रतिनिधी

सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये शिवसेना शिंदे गटामध्ये नेत्यांबरोबरच कार्यकर्त्यांचा येण्याचा ओघही वाढत आहे. आज वेंगुर्ले येथे उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या निवासस्थानी माजी खासदार मेजर सुधीर सावंत यांच्या उपस्थितीत म्हापण येथील श्रीवास परब, रमाकांत परब, अमोल परब, प्रभाकर परब यांनी शिवसेना शिदे गटात प्रवेश केला. त्यांचे सुधीर सावंत यांच्या हस्ते स्वागत करण्यात आले. यावेळी शिवसेना शिदे गटाचे वेंगुर्ला तालुका प्रमुख नितीन मांजरेकर, किर्लोस कृषी विज्ञान केंद्राचे डॉ.सावंत, अब्दुल शेख आदी उपस्थित होते.

यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना कर्नल सुधीर सावंत म्हणाले की, शिंदे सरकार सर्वसामान्यांचे सरकार असून महाराष्ट्राच्या विकासासाठी झटत आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात पर्यटन वाढीसाठी भरपूर वाव आहे. त्यासाठी पर्यटन धोरण ठरविणे गरजेचे असून आपण शिवसेना शिदे गटाचे मुख्यमंत्री एकनाथ शिदे यांच्याबरोबर बैठक घेणार आहे. तसेच उद्योग शहरात न राहता गावागावात झाले पाहिजे यासाठी प्रयत्न करणार असल्याचे माजी खासदार सुधीर सावंत यांनी सांगितले.

फोटो ओळी

 वेंगुर्ले शिवसेना शिंदे गटात प्रवेश करताना म्हापण येथील कार्यकर्ते सोबत ब्रिर्गेडियर सुधीर सावंत व शिवसेना तालुकाध्यक्ष नितीन मांजरेकर व शिवसेनीक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here