सिंधुदुर्गनगरी: ‘फिट इंडिया फ्रीडम रन‘ धावणे हा उपक्रम राबविण्याचे नियोजन युवा कार्यक्रम और मंत्रालय, नवी दिल्ली यांनी संपूर्ण देशभरात केले आहे. त्यानुसार दि 2 ऑक्टोबर ते 31 ऑक्टोबर 2022 या कालावधीत जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी, वरिष्ठ अधिकारी, राष्ट्रीय छात्र सेनेचे छात्र, स्काऊटस गाईट्स, नेहरु युवा केंद्राचे युवक, एन. एस. एस. चे छात्र, महाविद्यालयीन तसेच शालेय छात्र खाजगी संस्था, कार्यालये, तसेच सर्व खेळाडू यांनी फिट इंडिया फ्रीडम रन 3 कि.मी. चालणे या उपक्रमाचे आयोजन करावे, असे आवाहन क्रीडा अधिकारी विजय शिंदे यांनी केले आहे.
आजादी का अमृत महोत्सव निमित्त्ताने फिट इंडिया फ्रिडम रन उपक्रम पुढीलप्रमाणे आयोजन करण्यात येणार आहे. – दिनांक 2 ऑक्टोबर 2022 रोजी महात्मा गांधी यांच्या जन्मदिनानिमित्त राज्यामध्ये “आजादी का अमृत महोत्सव फिट इंडिया फ्रीडम रन” 3 कि.मी धावणे हा उपक्रम व्यापक स्वरुपात राबविण्यात येणार आहे. – 2 ऑक्टोबर 2022 रोजी Plog Run आयोजित करुन स्वच्छता आणि तंदुरुस्ती अशा दोन्ही बाबी साधावयाच्या आहेत. पळणे, जॅागिंग करत करत धावणे या वेळी रस्त्यात दिसणारा हाताने उचलता येईल असे कागदाचे कपटे, कचरा उचलून कचऱ्याच्या पिशवीत Garbage Bag मध्ये गोळा करुन स्वच्छता करावयाची आहे. ही विशेष सूचना एकता बिश्रोई, निशन डायरेक्टर,फिट इंडिया यांनी बैठकीमध्ये दिली आहे. वर्क फ्रॉम होम घरात बसून कामकाज करणारे युवक -युवती, नागरिक य सर्वांना देखील फ्रिडम रन या उपक्रमात सहभागी करुन घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. ऑलिंम्पिन खेळाडूंची टॉर्च रॅली आयोजित करण्यात यावी. फिटनेस का डोस -आधा घंटा रोज हा उपक्रम राबविण्यात यावा.
धावणे हे मानवी शरीराचे सर्वात मोठे स्वातंत्र्य आहे. त्यास नेहमी तंदुरुस्त फिटनेस नियमित व्यायामाची आवश्यकता असते. नियमित व्यायामाकरिता प्रोत्साहित करण्यासाठी आणि सर्वांना लठ्ठपणा, आळस, तणाव, चिंता, आजार इत्यादीपासून मुक्त होण्यासाठी मदत करण्यासाठी फिट इंडिया अंतर्गत फिट इंडिया फ्रीडम रन 3 कि.मी धावणे ही चळवळ 2 ऑक्टोबर ते 31 ऑक्टोबर 2022 या कालावधीत सर्व राज्यांनी राबविण्याचे केंद्र शासनाकडून कळविण्यात आले आहे. या उपक्रमामागील संकल्पना अशी आहे की तुम्ही कोठेही पळू चालू शकता. प्रत्येक जण धावण्यासाठी, चालण्यासाठी आपल्या आवडीचा मार्ग, व्यक्तिश: अनुकूल वेळ निवडू शकतात. आवश्यकतेनुसार काही मिनिटांची विश्रांती घेऊनही धावणे, चालणे करु शकणार आहेत. प्रत्येकास स्वत:च्या वेगाने धावणे चालण्याची मुभा असणार आहे. स्वयंलितपणे किंवा कोणत्याही ट्रॅकिंग ॲप किंवा जीपीएस घड्याळाचा वापर करुन धावलेल्या चाललेल्या अंतराचा मागोवा घेता येणार आहे


