Sindhudurg: स्वच्छ सर्वेक्षणात सिंधुदुर्ग जिल्ह्याची बाजी, राज्यात पहिला क्रमांक

0
47

प्रतिनिधी अभिमन्यू वेंगुर्लेकर

सिंधुदुर्गसिंधुदुर्ग जिल्ह्याने स्वच्छ सर्वेक्षण मध्ये पश्चिम भारतात दुसरा तर राज्यात पहिला क्रमांक पटकावला आहे. देशातील 17 हजार 450 गावे आणि 698 जिल्ह्यांमधून सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेची निवड करण्यात आली आहे. दिल्ली इथे विज्ञान भवनात झालेल्या कार्यक्रमात केंद्रीय ग्रामविकास तथा पंचायत राज मंत्री गिरीराज सिंह यांच्या हस्ते जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर, पाणी स्वच्छता मिशनचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी विनायक ठाकूर यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं. या पुरस्काराने जिल्हा परिषदेच्या इतिहासात मानाचा तुरा रोवला गेला आहे.https://sindhudurgsamachar.in/sindhudurg-गोव्यातून-विनापरवाना-ए/

स्वच्छ भारत मिशन टप्पा 2 अंतर्गत स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण 2022 मध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्याने पश्चिम भारतात दुसरा तर राज्यात पहिला क्रमांक पटकवला आहे. केंद्रीय जलशक्ती मंत्री गजेंद्रसिंह शेखावत, केंद्रीय राज्यमंत्री प्रल्हादसिंह पटेल, केंद्रीय सचिव सर्वेक्षण सुरु केलं. यावेळी देशातील शाळा, अंगणवाडी, आरोग्य केंद्र, धार्मिक स्थळं, बाजाराची ठिकाणं यांची पडताळणी करण्यात आली होती. या सर्वेक्षणात सर्व्हिस लेव्हल प्रोग्रेस, थेट निरीक्षण, तर नागरिकांचा प्रतिसाद यावर स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीणचे मूल्यांकन करण्यात आलं. त्या मूल्यमापनामध्ये अव्वल राहिल्यानेच स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण 2022 मध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्याला पश्चिम भारतात दुसरा तर महाराष्ट्रात पहिला क्रमांक मिळाला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here