Ratnagiri: महिला पोलिसाला शिवीगाळ करून तसेच धक्काबुक्कीकरणारा तरूणास एक महिना साधा कारावास आणि पाच हजार रुपये दंडची शिक्षा

0
34
दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनिय
रायगड जिल्ह्यात नोंदणीविना कार्यरत दिव्यांग संस्थांवर होणार कारवाई

लांजा (प्रतिनिधी) – कोरोना कालावधीत वाहन बंदी असताना आपले चार चाकी वाहन घेऊन येणाऱ्या तरूणाला जाब विचारणार्‍या महिला पोलिसाला शिवीगाळ करून तसेच धक्काबुक्की करून खाली पाडले आणि सोबतच्या कर्मचार्याला देखील शिवीगाळ करून मारण्यासाठी अंगावर धावत जाऊन सरकारी कामात अडथळा केला. या प्रकरणी जिल्हा अतिरिक्त सत्र न्यायालय रत्नागिरी यांनी लांजातील फकिर मोहम्मद हुसेन नेवरेकर (वय ३७) या तरुणाला सोमवारी ३ ऑक्टोबर रोजी एक महिना साधा कारावास आणि पाच हजार रुपये दंड अशी शिक्षा ठोठावली आहे.https://sindhudurgsamachar.in/sindhudurg-जिल्ह्यात-2-ऑक्टोबर-ते-31-ऑक/

मार्च २०२० पासून कोरोना महामारीचे संकट उद्भवले होते. त्यासाठी या व्हायरस प्रतिबंधक उपाय योजनेअंतर्गत जिल्हाधिकारी रत्नागिरी यांनी चार चाकी आणि तीन चाकी गाडीने वाहतूक करण्यास बंदी आदेश जारी केले होते. असे असतानाही लांजा बाजार पेठ येथील फकीर मोहम्मद हुसेन नेवरेकर याने आपल्या ताब्यातील स्विफ्ट (क्रमांक एम एच ०६- ए एक्स- १२१२) ही कार घेऊन लांजा स्टॅन्ड कडे स्वतः चालवत येत होते. या ठिकाणी शासकीय काम करणाऱ्या महिला पोलीस सुगंधा हरेश दळवी यांनी सदर तरुणाला चार चाकी वाहतूक गाडी चालवणे बंदी असताना तू गाडी घेऊन का आला? अशी विचारणा केली असता सदर आरोपी फकीर नेवरेकर याने महिला पोलीस सुगंधा दळवी यांना शिवीगाळ करून धक्काबुक्की करून त्यांना खाली पाडले. तसेच त्यांच्या सोबतच्या कर्मचाऱ्याला देखील शिवीगाळ करून त्याला मारण्यासाठी त्याच्या अंगावर धावून जाऊन सरकारी कामात अडथळा केला होता.
याप्रकरणी सुगंधा दळवी यांनी लांजा पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती. कोरोना विषाणू वाहतूक २०२० दिनांक २३/०३/२०२० अन्वये जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशाचा भंग केला म्हणून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता.https://sindhudurgsamachar.in/sindhudurg-कणकवली-नगरपंचायतीचा-त्/

याप्रकरणी अतिरिक्त सत्र न्यायाधीश रत्नागिरी यांनी सोमवारी ३ ऑक्टोबर रोजी निकाल देताना फकीर मोहम्मद हुसेन नेवरेकर याला भादवि कलम ३५३, ३३२ अन्वये एक महिना साधा कारावास आणि पाच हजार रुपये दंड तसेच दंड न भरल्यास १५ दिवसांचा साधा करावा कारावास अशी शिक्षा ठोठावली आहे .या निमित्ताने सरकारी वकील म्हणून प्रफुल्ल साळवी यांनी काम पाहिले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here