उद्धव ठाकरे यांच्या भाषणावर मनसेची प्रतिक्रिया

0
41
बिनविरोध निवडणुकांवर मनसेचा सवाल
बिनविरोध निवडणुकांवर मनसेचा सवाल

मुंबई: दरवर्षी शिवाजी पार्कवर होणारा दसरा मेळावा ही शिवसेनेची परंपरा आहे. दसरा मेळाव्याच्या निमित्ताने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाकडून जोरदार शक्तिप्रदर्शन करण्यात आले. या दसरा मेळाव्यात एकमेकांवर जोरदार आरोप – प्रत्यारोप ही केले गेले. मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार शिवसेनेचा वार्षिक दसरा मेळावा हा शिवाजी पार्क मैदानात पार पडला तर शिंदे गटाचा दसरा मेळावा हा वांद्रे- कुर्ला संकुलात झाला.

याच पार्श्वभूमीवर उद्धव यांच्या या भाषणावर राज ठाकरेंच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून प्रतिक्रिया आली आहे. संदिप देशपांडे म्हणाले की, उद्धव ठाकरेंच्या भाषणातील अनेक मुद्दे हे नळावरील भांडणाप्रमाणे होते. संदिप देशपांडे यांनी लगेच ट्विटरवरुन “नुसतीच ‘उणी’ ‘धुणी’ ‘नळ’ आणि ‘भांडण’; विचार ही नाही आणि सोनं ही नाही,” असे म्हटले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here