कोल्हापूर येथील प्रसिद्ध सार्झन डीजेच्या तालावर तरुणाई थिरकली; आ. वैभव नाईक यांच्या उपस्थितीत कणकवली शहरातून भव्य मिरवणूक
प्रतिनिधी :पांडुशेठ साठम
कणकवली – शिवसेना कणकवली तालुका आयोजित नवरात्रोत्सवानिमित्त प्रतिष्ठापणा केलेल्या दुर्गामातेची भव्य विसर्जन मिरवणूक आज काढण्यात आली.आमदार वैभव नाईक, जिल्हा बँक माजी अध्यक्ष सतीश सावंत,युवानेते संदेश पारकर यांच्या प्रमुख उपस्थितीत नवरात्रोत्सव स्थळापासून महामार्गावरून पटवर्धन चौक ते कणकवली बाजारपेठेतुन गणपती साना पर्यंत देवीची भव्य मिरवणूक काढण्यात आली. https://sindhudurgsamachar.in/maharashtra-शिंदे-सरकारचा-मोठा-निर्/
कोल्हापूर येथील प्रसिद्ध सार्झन डीजे मिरवणुकीचे खास आकर्षण होते. या डीजेच्या ठेक्यावर तरुणाईने ताल धरला होता. यावेळी सर्व शिवसेना, युवासेना, महिला आघाडीच्या पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


