Kokan: श्री पंचम खेमराज महाविद्यालय सावंतवाडी येथे 14 ऑक्टोबर 2022 रोजी रोजगार मेळावा

0
289
RITES लिमिटेडमध्ये 400 सहाय्यक व्यवस्थापक पदांसाठी मेगा भरती; ऑनलाइन अर्ज सुरू
RITES लिमिटेडमध्ये 400 सहाय्यक व्यवस्थापक पदांसाठी मेगा भरती; ऑनलाइन अर्ज सुरू

सावंतवाडी:जिल्ह्यातील खासगी उद्योजक व बेरोजगार उमेदवारांसाठी शुक्रवार दिनांक 14 ऑक्टोबर 2022 रोजी श्री पंचम खेमराज महाविद्यालय सावंतवाडी येथे रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला आहे. जिल्ह्यातील उद्योजक व उमेदवारांनी रोजगार मेळाव्यात जास्तीत जास्त सहभागी व्हावे असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे प्र. सहायक आयुक्त इनुजा शेख यांनी केले आहे. https://sindhudurgsamachar.in/sindhudurg-विकासकामांबाबत-पालकमं/

उद्योजकांनी आपल्या आस्थापनेवार असलेली रिक्तपदे www.rojgar.mahaswayam.gov.in या पोर्टलवर अधिसूचित करावीत. ज्या उद्योग आस्थापनांनी पोर्टलवर नोंदणी केलेली नाही परंतु त्यांना मनुष्यबळाची आवश्यकता आहे. अशा उद्योजकांनी प्रथम पोर्टलवर नोंदणी करुन रिक्तपदे अधिसूचित करावीत. उद्योजकांनी पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्यामध्ये रिक्तपदे अधिसूचित केल्यानंतर नोकरी साधक (JOB SEEKER)उमेदवारांनी वरिल पोर्टलवर स्वत:च्या लॉगीनने आपल्या शैक्षणिक पात्रतेनुसार संबंधित पदासाठी ॲप्लाई करावे. दिनांक 14 ऑक्टोबर 2022 रोजी श्री पंचम खेमराज महाविद्यालय सावंतवाडी येथे मुलाखतीसाठी उपस्थित रहावे.

अधिक माहितीसाठी 02362 228835,9403350689 वर संपर्क साधावा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here