Kokan: पावसामुळे भातपीक कापणी लांबणीवर पडणार; पावसाचा जोर वाढल्यास पिकाला धोका, शेतकरी चिंतेत

0
28
पावसामुळे भातपीक कापणी लांबणीवर पडणार; पावसाचा जोर वाढल्यास पिकाला धोका, शेतकरी चिंतेत

सिंधुदुर्ग– मागील ४ ते ५ दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसाने रत्नागिरी जिल्ह्यात पुन्हा हजेरी लावली आहे. त्यामुळे भातपिकाची कापणी लांबणीवर पडणार आहे. साधारण दसऱ्यानंतर कोकणात भातपिकाच्या कापणीला सुरुवात होते. सध्या हळव्या भातपिकामध्ये दाणे भरले असून ही पिके कापणीच्या अवस्थेत आहेत. मात्र पावसामुळे आता कापणी लांबणीवर पडणार आहे. काही ठिकाणी भातशेती आडवी झाल्याने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकरी चिंतातुर झाला आहे. पावसाचा जोर वाढल्यास या पिकाला धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.https://sindhudurgsamachar.in/maharashtra-सिल्व्हर-ओकवर-हल्ला-प्र/

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here