Breaking: आमदार नाईक यांची एसीबीमार्फत चौकशी सुरू करण्यात आल्याने जिल्ह्यात खळबळ

0
31

सत्ता बदल होताच शिवसेनेच्या अनेक नेत्यांची ईडी,सीबीआयमार्फत चौकशी करून कारवाई केली जात असतानाच आता आमदार नाईक यांची एसीबीमार्फत चौकशी सुरू करण्यात आल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. या अनुषंगाने नाईक यांचा जवाब नोंदविण्यासाठी १२ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता पोलीस उपअधीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग रत्नागिरी येथे उपस्थित राहण्यासंदर्भातही नाईक यांना पत्र देण्यात आले आहे.

पोलीस उपअधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, रत्नागिरी यांनी आ.वैभव नाईक यांना उघड चौकशीचे अनुषंगाने मालमत्ता व दायित्वाचे १ ते ६ फॉर्म्स भरून देण्यासाठी व जवाब नोंदवून घेण्यासाठी नोटीस बजावली. त्यानुसार कणकवली शासकीय विश्रामगृहावर आ. वैभव नाईक यांनी हजेरी लावत चौकशीला सामोरे गेले. या वेळी उत्पन्न, खर्च व मालमत्ता याबाबतची आवश्यक ती माहिती मत्ता व दायित्वाबाबत घेतले जबाब नोंदवले. त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ आहे.

यावेळी आम. वैभव नाईक यांच्या समर्थनार्थ शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित झाले होते. माजी जि.प.सदस्य नागेंद्र परब, उपजिल्हाप्रमुख अमरसेन सावंत, कुडाळ तालुका संघटक बबन बोभाटे, कुडाळ शिवसेना नेते अतुल बंगे, शहरप्रमुख संतोष शिरसाट,माजी जि.प.सदस्य राजू कविटकर, माजी उपसभापती जयभारत पालव, उपतालुकाप्रमुख कृष्णा धुरी, बाळू पालव, युवासेना तालुकाप्रमुख योगेश धुरी, ओबीसी सेल जिल्हाप्रमुख रुपेश पावसकर कुडाळ नगरसेवक किरण शिंदे, उदय मांजरेकर, श्रेया गवंडे, सचिन काळप, सचिन कदम, अनुप नाईक, विकास राऊळ आबा मुंज, आदिंसह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here