नवी दिल्ली- अखेर निवडणूक आयोगाने शिवसेनेचे ‘धनुष्यबाण’ हे चिन्ह तात्पुरत्या स्वरुपात गोठविण्यात आल्याचा निर्णय दिला आहे. तसेच शिवसेनेच्या दोन्ही गटांना या चिन्हाचा वापर करता येणार नाही असे म्हटले आहे. शिवाय दोन्ही गटांना शिवसेना हे नाव देखील वापरता येणार नाही असा निर्णय दिला आहे. आता दोन्ही गटाला शिवसेना ऐवजी वेगळे नाव आणि वेगळे चिन्ह घ्यावे लागेल. आगामी येऊ घातलेली विधानसभेची अंधेरी मतदारसंघातील पोटनिवडणूकीत आणि मुंबईच्या महापालिका निवडणुकीमध्ये शिवसेनेच्या दोन्ही गटाला आपले धनुष्यबाण वापरता येणार नाही. तसेच शिवसेना हे नाव सुद्धा वापरता येणार नाही.https://sindhudurgsamachar.in/sindhudurg-वेंगुर्ल्यातील-महाआरो/
निवडणूक आयोगाने दोन्ही गटाचे म्हणणे ऐकून व कागदपत्राची तपासणी करत रात्री उशिरा शिवसेना पक्षाचे चिन्ह आणि नावाबाबतचा हा निर्णय दिला. अद्याप अंतिम निर्णय झालेला नाही. अर्थात हा निर्णय तात्पुरत्या स्वरुपाचा आहे. दोन्ही गटाचे म्हणणे या पुढे ऐकून अंतिम निर्णय निवडणूक आयोग घेऊ शकतो. मात्र अंतिम निर्णय देण्यासाठी किती अवधी लागणार हे अद्याप माहित नाही त्यामुळे तात्पुरत्या स्वरुपाचा निर्णय निवडणूक आयोगाने तुर्तास दिला आहेhttps://sindhudurgsamachar.in/sindhudurg-बाह्य-कार्याचेही-शिक्ष/
निवडणूक आयोग जेव्हा अंतिम निर्णय घेईल तेव्हा कोणत्यातरी एका गटाला एखाद्यावेळेस मूळ ‘शिवसेना’ हे नाव आणि त्याचे ‘धनुष्यबाण’ चिन्ह पुन्हा मिळू शकते. मात्र हे सर्व निवडणूक आयोगाकडे दोन्ही गटाचे सर्व म्हणणे व कागदपत्रे तपासल्यानंतर अंतिम निर्णय घेतला जावू शकतो.
तुर्तास आगामी अंधेरीपूर्व मतदारसंघाची विधानसभा पोटनिवडणुकीत दोन्ही गटाला शिवसेना सोडून एक नाव व एक चिन्ह घेऊन निवडणुकीला समोरे जावे लागणार आहे. तसेच नव्या चिन्ह आणि नावाला लोकांपर्यंत घेऊन जाण्याचे आव्हान राहणार आहे. तसेच लवकर निवडणूक आयोगाचा निर्णय आला नाही तर मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत सुद्धा अशा प्रकारे समोरे जावे लागणार आहे.

