ओरोस: जिल्हाधिकारी कार्यालयात ई-पीक पाहणी ॲप सद्यस्थिती आढवा बैठक झाली. त्यावेळी ई-पीक पाहणी ॲपवर जास्तीत जास्त शेतकऱ्यांची नोंद व्हावी, यासाठी तालुका- स्तरावर शिबिरांचे आयोजन करावे. शिबिरात ई-पीक पाहणी ॲपवर नोंदणी करण्यासाठी येणाऱ्या शेतकऱ्यांना आवश्यक कागदपत्रांची माहिती व्हावी, यासाठी संबंधित यंत्रणांनी जनजागृती करावी. अशा सूचना जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांनी दिल्या.
यावेळी अपर जिल्हाधिकारी शंकर बर्गे, जिल्हा विपणन अधिकारी ए.एस. देसाई, जिल्हा संघाचे एकनाथ सावंत, कुडाळ तालुका संघाचे नंदकिशोर करावडे, वैभववाडी संघाचे सिध्देश रावराणे, कणकवली संघाचे किशोर राऊत, बजाज राईस मिलचे व्यवस्थापक संदीप चव्हाण, जिल्हा बँक कर्ज विभागाचे व्यवस्थापक ए.बी.वरक यांच्यासह खरेदी- विक्री संघांचे पदाधिकारी उपस्थित होते. https://sindhudurgsamachar.in/sindhudurg-जिल्ह्यातील-नवउद्योजक/
ई-पीक पाहणी ॲपवर नोंदणी करताना येणाऱ्या तांत्रिक अडचणी दूर करण्यासाठी वरिष्ठ स्तरावर प्रयत्न केले जातील, असे आश्वासित करुन जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी म्हणाल्या, ई- पीक ॲपवर शेतकऱ्यांनी नोंदणीसाठी येताना चालू खरीप हंगाम 2022-23 मधील धान (भात) पीक लागवडीची नोंद असलेला डिजिटल स्वाक्षरीची मूळ सातबारा प्रत, आधारकार्ड व बँक पासबुकाची झेरॉक्स सोबत आणणे आवश्यक आहे. शेतकऱ्यांनी अधिक माहितीसाठी संबंधित मंडळ अधिकारी अथवा संबंधित गावच्या तलाठी यांच्याशी संपर्क साधावा.https://sindhudurgsamachar.in/kokan-श्री-पंचम-खेमराज-महाविद्/
ई-पीक पाहणी ॲपवर जास्तीत जास्त शेतकऱ्यांची नोंद व्हावी यासाठी तालुक्यातील खरेदी विक्री संघ बाजार समित्या,जिल्हा बँकेच्या शाखांनी नोंदणी केंद्र सुरु करावी. असेही त्या म्हणाल्या. जिल्हा विपणन अधिकारी श्री.देसाई यांनी ई-पीक ॲप नोंदणी बाबत म्हणाले,जिल्ह्यातील ज्या शेतकऱ्यांना हमीभावाने धान शासकीय खरेदी केंद्रावर विक्री करायची आहे, त्या शेतकऱ्यांकरिता विक्रीसाठी खरेदी केंद्रावर आगाऊ ऑनलाईन नोंदणी सुरू केली आहे. मार्केटिंग फेडरेशनच्या जिल्हा कार्यालयमार्फत जिल्ह्यात 28 ठिकाणी नोंदणी केंद्र सुरू केली आहेत.https://sindhudurgsamachar.in/manoranjan-गुजराती-चित्रपट-छेलो-श/.
कोठे सुरु आहे नोंदणी ? शेतकऱ्यांनी खरेदी केंद्रावर 15 ऑक्टोबरपर्यंत नोंदणी करावी, जिल्हा मार्केटिंग कार्यालयामार्फत जिल्ह्यात 28 ठिकाणी नोंदणी केंद्र सुरु केली आहेत. – –सावंतवाडी तालुका खरेदी विक्री संघ लि मार्फत सावंतवाडी, मळगाव,मळेवाड, मडुरा, डेगवे, कोलगाव, इंन्सूली, तळवडे, भेडशी. –कुडाळ तालुका खरेदी विक्री संघ लि. मार्फत कुडाळ, कसाल, माणगाव, घोडगे,निवजे, आंब्रड, पिंगूळी, पणदूर,कडावल, तुळस. –शेतकरी तालुका खरेदी विक्री संघ लि कणकवली. मार्फत कणकवली. –वेंगुर्ला तालुका खरेदी विक्री संघ लि. मार्फत वेंगुर्ला. –देवगड तालुका खरेदी विक्री संघ. लि. मार्फत देवगड, पडेल, पाटगाव. –मालवण तालुका खरेदी विक्री संघ लि. मार्फत पेंडूर. –वैभववाडी तालुका खरेदी विक्री संघ लि मार्फत वैभववाडी. –सिंधुदुर्ग जिल्हा कृषी औद्योगिक सर्व सेवा सह. संघ लि. मार्फत ओरोस, कट्टा येथे नोंदणी केंद्र सुरु केलेली आहेत.
ज्या शेतकऱ्यांना शासकीय हमीभाव खरेदी केंद्रावर धान विक्री करावयाची आहे. अशा शेतकऱ्यांना नोंदणीकरिता शासनाकडून 15 ऑक्टोबर 2022 पर्यंत मुदत दिलेली आहे. याबाबत शेतकऱ्यांनी सातबारा मिळण्याबाबत काही अडचण निर्माण झाल्यास तहसिल कार्यालय, तलाठी कार्यालय, तालुका खरेदी विक्री संघ,जिल्हा मार्केटिंग अधिकारी कार्यालय यांच्याशी संपर्क करावा, असेही ते म्हणाले


