नवी मुंबई – कोकण रेल्वे प्रकल्प ग्रस्थांच्या बेरोजगारीचा प्रश्न सोडविण्या साठी दिनांक १२ / १० / २०२२ रोजी बेलापूर येथे अशोकराव जाधव यांचे नेतृत्वाखाली कोकण रेल्वेचे सी पी ओ डायरेक्टर मेश्राम यांचे समवेत प्रकल्प ग्रस्थांच्या प्रमुख व्यक्ती सोबत सुमारे पावने दोन तास सविस्तर मुद्येसुद चर्चा झाली त्यामध्ये खालील निर्णयाची अंमलबजावणी करणेचे ठरले त्या पैकी जितके प्रकल्पग्रस्थ रोजगार मागत आहेत त्या प्रकल्प ग्रस्थांनी आपल्या कागद पत्रांची स्वतंत्र फाईल करून द्यायची आहे , या फाईल्स् मध्ये ज्यांची जमिन गेली आहे त्या नोटीसा, त्यांनी नोकरी साठी केलेल्या अर्जाच्या व त्यासाठी जोडलेले कागदपत्रे , रेल्वेकडून ऊत्तरा दाखल आलेली कागदपत्रे , जे ऊमेदवार परिक्षा पास आहेत , त्यांना का नाकारले त्याची रेल्वेकडून आलेली कागदपत्रे , कागदपत्रे पूर्ण असुनही आणि सर्व प्रक्रिया पुर्ण झाल्या आहेत पण ज्यांना कॉल येणे आवश्यक होते अशांची कागदपत्रे , ज्यांची जमिन संपादीत केली आहे परंतू योग्य मोबादला मिळाला नाही म्हणून दाखल केलेले अर्ज ही सर्व प्रकल्प बाधितांची प्रत्येकाची स्वतंत्र फाईल( झेरॉक्स ) फाईलवर ज्यांच्या नावावर जागा असताना संपादित केली आहे त्याचे नाव , त्यानंतर त्याच्या वारसाचे नाव आणि ज्याने नोकरीसाठी अर्ज केला आहे त्याचे पुर्ण नाव व पोस्टाचा पत्ता फाईलच्या पहिल्या पानावर लावयाचा आहे आणि सिंधुदुर्ग , रत्नागिरी , रायगड जिल्हातील तालुका वार एकत्रीत करून नंबर टाकून द्यायच्या आहेत सदर फाईल्स परस्पर न देता शेतकरी कष्टकरी प्रकल्पग्रस्थ संघटनेच्या वतीने सर्व प्रकल्प ग्रस्थांनी द्यायच्या आहेत कारण या सर्व फाईल्सची छाननी स्वःहा सी पी ओ ऑफीस करणार आहे व जे ऊमेदवार या मध्ये बसतात त्यांना रेल्वे कर्मचारी म्हणून ज्यांनी सर्व प्रक्रिया पुर्ण केल्या आहेत त्यांना सेवेमध्ये कायम घेणार असा निर्णय बैठकीत झाला आहे . https://sindhudurgsamachar.in/ratnagiri-कोंकणातील-पहिला-सर्वात/
ही सर्व कागदपत्रे ( फाईल्स ) दिनांक १५ नोव्हेंबर पर्यंत बेलापूर कार्यालयात जमा करावयाच्या आहेत .याच बरोबर दुसरा निर्णय कोकण रेल्वे मध्ये जे कंट्राटी कामगार घेतले जातात ते कामगार प्रकल्पग्रस्थांच्या मधिलच घ्यावेत जर त्यामध्ये ऊपलब्ध नसतिल तरच बाहेरचे घ्यावेत परंतू प्रकल्प ग्रस्थ कंट्राटी कामगार आहे म्हणून त्याला रेल्वेची परिक्षा देणे पासुन कंट्राट दाराने अगर रेल्वे प्रशासन अडवणार नाही असाही महत्वपूर्ण निर्णय झाला आहे . त्याच बरोबर प्रकल्पग्रस्थ ऊमेदवारांच्या परिक्षेकरीता पासींग साठ मार्काचे ठेवले आहे ते 3० मार्काचे ठेवावे या मागणीवर रेल्वे मंत्रालयाकडे शिफारस करणेचे ठरले व त्यासाठी कोकण रेल्वे बोर्ड आणि शेतकरी -कष्टकरी प्रकल्पग्रस्थसंघटनेने संयुक्त प्रयत्न करणेचे ठरले . वरील प्रमाणे सकारात्यक चर्चा झाली. या मध्ये प्रबंधक कांबळे साहेब , चंद्रसेन साहेब , घाग मॅडम आणि सर्वात महत्वाचे मेश्राम साहेबांनी प्रकल्प ग्रस्थांबाबत सकारात्मक दृष्टीकोन ठेवला व बैठक पार पडली . सदर बैठकी मुळे रेल्वे प्रकल्प ग्रस्थांमध्ये आशेचा किरण दिसू लागला असलेने प्रकल्पग्रस्थां साठी निरपेक्ष आणि निस्वार्थ पणे काम करणाऱ्या अशोकराव जाधवांचे अभिनंदन सर्वत्र होत आहे .https://sindhudurgsamachar.in/ratnagiri-दापोली-नगर-पंचायतीत-५-को/

