Kokan: लटकेंचा राजीनामा मंजुर करण्याचे आदेश देत न्यायालयाची शिंदे सरकारला चपराक – खा.विनायक राउत

0
17
लटकेंचा राजीनामा

कणकवली – शिंदे सरकार अधिका-यांवर दबाव टाकत आता लाचलुचपत विभागाच्या माध्यमातून आ. वैभव नाईक यांना नोटीस बजावली आहे. शिंदे सरकारच्या विरोधात वैभव नाईक यांच्या समर्थनार्थ नागरिक , महाविकास आघाडीचे कार्यकर्ते आणि शिवसेना एकत्रित 18 ऑक्टोंबरला लाचलुचपत विभाग कुडाळ कार्यालयावर मोर्चा काढणार आहे. ऋतुजा लटकेंचा राजीनामा उद्या सकाळी 11 वाजेपर्यंत मंजुर करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने देत सरकारला चपराक दिल्याचा टोला शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी लगावला.https://sindhudurgsamachar.in/ratnagiri-दापोली-नगर-पंचायतीत-५-को/

कणकवली येथील विजय भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते यावेळी आ. वैभव नाईक , उपनेते गौरीशंकर खोत , संपर्क प्रमुख अरुण दुधवडकर, माजी बॅंक अध्यक्ष सतिश सावंत, सहसंपर्कप्रमुख प्रदिप बोरकर, अतुल रावराणे, उपजिल्हाप्रमूख राजू शेटये, महिला आघाडी प्रमुख निलम सावंत, नगरसेवक कन्हैया पारकर आदी उपस्थित होते.
शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या सोबत राहिलेल्या निष्ठावंतांना त्रास देण्याचा प्रयत्न सरकराकडून केला जात आहे. आयुक्तांवर दबाव टाकत ऋतुजा लटकेंचा राजीनामा मंजुर केला नव्हता. अखेर न्याय देवतेने लटकेंचा राजीनामा मंजुर करण्याचे आदेश दिले आहेत. https://sindhudurgsamachar.in/शेतकरी-कष्टकरी-प्रकल्पग/

सर्व यंत्रणा सरकारच्या दबावाखाली काम करत असून शिवसेना आ. वैभव नाईकांनाही लाचलुचपत विभागाने नोटीस बजावून त्रास सुरु केला आहे. ही नवीन एजन्सी आणत त्या अधिका-यांना कामाला लावल आहे. वैभव नाईकांविरोधात कुठल्यातरी निनावी पत्राची दखल घेवून नोटीस दिली आहे. सर्व व्यवहार पारदर्शक आहेत. त्यामुळे घाबरण्याची गरज नाही. या चौकशील वैभव नाईक सामोरे जातील. आम्ही मोर्चा काढत चौकशी निपक्षपाती करावी हे त्या अधिका-यांना जाणीव करुन देणार आहोत. त्यामुळे जनता 18 ऑक्टोंबरला कुडाळ येथील शिवसेना कार्यालय ते लाचलुचप कार्यालय हा मोर्चा काढण्यात येईल असे खा. विनायक राऊत यांनी सांगितले.https://sindhudurgsamachar.in/ratnagiri-फिनोलेक्स-इंडस्ट्रीज-आ/

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here