Sindhudurg: जिल्ह्यात तुरळक मेघ गर्जनेसह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता

0
40
जिल्ह्यात तुरळक मेघ गर्जनेसह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता
कोकणात वादळी पावसाच्या शक्यतेने यलो अ‍लर्ट जारी

जिल्ह्यात दि. 14 ऑक्टोबर व 16 ऑक्टोबर ते 18ऑक्टोबर या कालावधीत तुरळक मेघ गर्जनेसह मुसळधार पाऊस पडण्याची, वीजा चमकण्याची व 30 ते 40 किमी प्रति तास वेगाने वारे वाहण्याची शक्यता प्रादेशिक हवामान विभाग मुंबई यांच्याकडून वर्तविण्यात आलेली आहे. त्यामुळे या कालावधीत नागरिकांनी पुढीलप्रमाणे दक्षता घ्याण्याचे आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण सिंधुदुर्ग मार्फत करण्यात येत आहे. https://sindhudurgsamachar.in/sindhudurg-अज्ञात-गाडी-चालकाकडून-व/

विजा चमकत असताना पुढीलप्रमाणे दक्षता घ्यावी. संगणक, टीव्ही इत्यादी विद्युत उपकरणे बंद ठेवून स्त्रोतांपासून अलग करून ठेवावीत. दूरध्वनी, भ्रमणध्वनीचा वापर टाळावा. * नागरिकांनी घराबाहेर पडू नये. घराबाहेर असल्यास सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा. विजेच्या खांबांपासून लांब रहावे. * उंच झाडाखाली आश्रयास थांबू नये. * एखाद्या मोकळया परिसरात असल्यास, गुडघ्यामध्ये डोके घालून वाकून बसावे. * धातूच्या वस्तू दूर ठेवाव्यात. * आपल्या मोबाईलवर दामिनी ॲप डाऊनलोड करुन घ्यावे. * पाऊस पडत असताना, विजा चमकत असल्यास झाडाखाली उभे राहू नये, मोबाईलवर संभाषण करु नये आणि इलेक्ट्रिक वस्तुपासून दुर रहावे. अशा परिस्थितीत पक्के घर किंवा इमारतीत आसरा घ्यावा. https://sindhudurgsamachar.in/sindhudurg-आंतरमहाविद्यालयीन-क्र/

मुसळधार पावसामुळे उद्भवलेल्या कुठल्याही प्रकारच्या आपत्कालीन परिस्थितीमध्ये मदतीसाठी जिल्हा नियंत्रण कक्ष- 02362-228847 किंवा टोल फ्री – 1077 ला संपर्क करावा, तसेच तालुका नियंत्रण कक्ष दोडामार्ग तालुक्यासाठी – 02363-256518, सावंतवाडी तालुक्यासाठी – 02363-272028, वेंगुर्ला तालुक्यासाठी – 02366-262053, कुडाळ तालुक्यासाठी – 02362-222525, मालवण तालुक्यासाठी – 02365-252045,कणकवली तालुक्यासाठी – 02367-232025, देवगड तालुक्यासाठी– 02364-262204, वैभवाडी तालुक्यासाठी – 02367-237239 या दूरध्वनी क्रमांकांवर संपर्क साधावा. *

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here