प्रतिनिधी : अभिमन्यू वेंगुर्लेकर
सिंधुदुर्ग मध्ये प्रथमच मराठा समाजाकडून मोठ्या प्रमाणात कमर्शियल व्हेईकल एक्सपो आयोजित करण्यात आला. यामध्ये सर्व प्रकारच्या गाड्या व सर्व बँका व फायनान्स आणि अण्णासाहेब पाटील महामंडळ सहभागी झाले होते. तीन दिवस चालणाऱ्या कमर्शियल व्हेईकल एक्सपोला 5000 पेक्षा अधिक लोकांनी सहभाग दर्शविला.
या कार्यक्रमला माननीय आमदार वैभवजी नाईक उपस्थित होते. कार्यक्रमाला माननीय खासदार विनायक राऊत साहेब व त्यांच्या सहकाऱ्यांनी भेट दिली. यावेळी जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स चे अध्यक्ष ललित गांधी, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अशोक सावंत, कार्यकारी संचालक राजापुर बँक शेखर कुमार अहिरे, महाराष्ट्र राज्य ट्रक टेम्पो टॅन्कर बस वाहतूक महासंघाचे उपाध्यक्ष शिवाजी घोगळे, रिक्षा संघटना अध्यक्ष संजय शारबिद्रे, आणि या कार्यक्रमाचे सर्वै सर्व एडवोकेट सुहास सावंत, सिंधुदुर्ग जिल्हा अखिल भारतीय मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष, कुडाळ तालुका अध्यक्ष सुंदर सावंत, वेंगुर्ला तालुका अध्यक्ष मनोहर येरम, जिल्हा समन्वयक बंड्या सावंत, जिल्हा समन्वयक धीरज परब, कुडाळ तालुका अखिल भारतीय मराठा महासंघाचे युवक अध्यक्ष शैलेश घोगळे, अखिल भारतीय मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष विद्यार्थी संघटना अनुप सेन सावंत, सोशल मीडिया प्रमुख हर्षद पालव, कार्यालय प्रमुख वैभव जाधव, रवी राऊळ, संग्राम सावंत उपस्थित होते. सिंधुदुर्ग जिल्हा उपप्रादेशिक परिवहन अधिकारी नंदकिशोर काळेसाहेब, हायवे ट्राफिकचे प्रमुख गोसावी साहेब, यांनी भेट दिली.
यावेळी उपनगराध्यक्ष मंदार शिरसाट, नगरसेवक संजय पडते उपस्थित होते. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत, काका कुडाळकर, भास्कर परब, नजीर शेख, यांनी कार्यक्रमला उपस्थिती दर्शवलेली तसेच ऑल इंडिया मोटर ट्रान्सपोर्ट चे मेंबर मनोज वालावलकर व इंडियन ऑइल चे डायरेक्टर सुनिल महाराणा आणि राहुल भारव्दाज्ञ उपस्थित होते. यामध्ये राजापूर अर्बन बँक, सिंधुदुर्ग जिल्हा बँक, बँक ऑफ बडोदा, इन्डसलॅन्ड फायनान्स या सर्वांनी मिळून तीन कोटी रुपयांची उलाढाल केली. कार्यक्रमाच्या समारोपाला कुडाळ तालुक्याचे तहसीलदार माननीय अमोल फाटक उपस्थित होते.

